ठाणे दि.21 (जिमाका) :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1)(अ) नुसार प्रत्येक सहकारी संस्थेने प्रत्येक वर्षांचे वैधानिक लेखापरिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त केलेल्या सहकार विभागाच्या नामतालीकेवरील लेखापरिक्षकांकडून अथवा निबंधकाने नियुक्त केलेल्या लेखापरिक्षकांकडून दि. 31 जुलै पर्यंत पुर्ण करुन घेणे आवश्यक आहे.
ज्या सहकारी संस्था, सन 2020-21 चे वैधानिक लेखापरिक्षण दि. 31.07.2021 पुर्वी पुर्ण करुन घेण्यास असमर्थता दर्शवतील अथवा टाळाटाळ करतील किंवा संबंधित लेखापरिक्षकांस विहीत मुदतीत लेखापरिक्षणासाठी दप्तर उपलब्ध करुन देण्यास कुचराई करतील अशा सर्व सहकारी संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार संस्था नोंदणी रद्द करणे, संचालक मंडळ बरखास्त करणे, संबंधित अधिकारी/पदाधिकारी पदावर राहण्यास अपात्र ठरणे तसेच संबंधितांवर उचित कायदेशिर शिक्षा व आर्थिक स्वरुपाचा दंड ई. स्वरुपाची निबंधकांकडून कारवाई करण्यात येईल.
सर्व वैधानिक लेखापरिक्षकांनी यांनी (सनदी लेखापाल/फर्म/प्रमाणित लेखापरिक्षक) त्यांची नियुक्ती झालेल्या संस्थेचे सन 2020-21 चे लेखापरिक्षण विहीत मुदतीत दि. 31.07.2021 पुर्वी पुर्ण करण्यात टाळाटाळ अथवा कुचराई केल्यास तसेच सबळ कारणाशिवाय विहित मुदतीत पुर्ण न केल्यास संबंधित लेखापरिक्षक सहकार कायदा व नियमामधील तरतुदीनुसार उचित कारवाईस पात्र राहतील. ही बाब संबंधित लेखापरिक्षकांनी गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा वैधानिक लेखापरिक्षकांचे नाव सहकार खात्याचे लेखापरिक्षक नामतालीकेवरुन कमी करणे बाबत कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, ठाणे यांनी कळविले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment