घणसोली : नवी मुंबई महानगरपालिका घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील बाळारामवाडी, जिजामाता नगर व घणसोली गांव याठिकाणी आरसीसी जोत्याचे बांधकाम तसेच आरसीसी तळमजला कॉलमचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते. या तिन्ही अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या होत्या. त्यास अनुसरून संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांनी ही बांधकामे स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी ही अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती.
या अनधिकृत बांधकामांवर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले व तिन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर 15, ब्रेकर 4, गॅस कटर 1, जेसीबी 1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढील काळातही अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment