Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

नमुंमपा शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया  

 ‍ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पालकांना कळविण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दु व इंग्रजी (स्टेट बोर्ड) च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पूर्वप्राथमिक व इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी करीता नि:शुल्क प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच नमुंमपा सी.बी.एस.ई. शाळा क्र. 93 कोपरखैरणे, सेक्टर-14 व नमुंमपा सी.बी.एस.ई. शाळा क्र. 94 नेरूळ, सेक्टर-50 या शाळेमध्ये फक्त नर्सरी वर्गाचे प्रवेश सुरू करण्यात येत आहेत.  तरी इच्छूक पालकांनी नर्सरी साठी 3 वर्षे पूर्ण झालेल्या (मानिव दिनांक 31 डिसेंबर, 2021) आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित शाळेत जाऊन दिनांक 10/07/2021 पर्यंत अर्ज करावेत.  प्रवेशापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दत राबवुन निवड करण्यात येईल. नवी मुंबई महानगरपालिका शाळांच्या  सुसज्ज इमारती  असून यामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.  तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते.  महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांसाठी विमा योजनेचे संरक्षण  दिले जाते.  विद्यार्थ्यांना ईल

नवी मुंबई महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने भरतीच्या खोट्या जाहीरातीबाबत जागरूकतेचे आवाहन

  नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गार्ड, सुपरवायझर, स्क्रिनींग ऑफीसर, क्लार्क, अकाऊंटन्ट, वॉर्ड बॉय, हाऊसकिपींग अशी विविध संवर्गातील पदे करार पध्दतीने भरणेबाबतची खोटी जाहीरात व्हॉ़ट्स ॲप आणि इतर सोशल माध्यमांवर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर जाहिरातीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे खोटे लेटरहेड तयार करून जाहिरात बनविण्यात आलेली आहे.       वास्तविकत: अशी कोणतीही जाहिरात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रसिध्द करण्यात आलेली नाही.  तरी नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणा-या जाहिरातींना बळी पडू नये व प्रतिसाद देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेविषयी कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेची वेबसाईट  https://www.nmmc.gov.in  यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर पेजला भेट द्यावी असे आवाहन आहे.

कोव्हीडच्या तिस-या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक उपाययोजना

  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आजपासून कोव्हीड प्रतिबंधात्मक तिस-या स्तरासाठीची नियमावली लागू करण्यात आली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे विभाग कार्यालय व मुख्यालय स्तरावरून काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश विशेष दक्षता पथकांना देण्यात यावेत असे आदेशित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वाढ करण्यात येत असलेल्या सर्व आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेत कार्यपूर्ततेसाठी 31 जुलैची डेडलाईन दिली,.       कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीबाबतच्या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे उपस्थित होते.       दुसरी लाट काही प्रमाणात ओसरू लागल्याचे निदर्शनास आले तरी महानगरपालिकेने टेस्टींगचे प्रमाण कमी केलेले नाही. सध्या नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून त्

घणसोली विभागातील 3 अनधिकृत बांधकामे निष्कासित

  घणसोली : नवी मुंबई महानगरपालिका घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील बाळारामवाडी, जिजामाता नगर व घणसोली गांव याठिकाणी आरसीसी जोत्याचे बांधकाम तसेच आरसीसी तळमजला कॉलमचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते. या तिन्ही अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या होत्या. त्यास अनुसरून संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांनी ही बांधकामे स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी ही अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती.       या अनधिकृत बांधकामांवर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले व तिन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर 15, ब्रेकर 4, गॅस कटर 1, जेसीबी 1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते. यापुढील काळातही अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.  

खारघर येथील विश्वज्योत शाळेने केला कहर, फी नाही भरली म्हणून थेट २८ विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा अवैधरित्या दाखला पोस्टाने दिला घरी पाठवून !!

 युवासेनेचे राष्ट्रीय सह सचिव यांनी घेतली दखल, पालकांसोबत करणार आंदोलन !*  कोविड काळातही नवी मुंबईतील विश्वजोत इंटरनॅशनल स्कुल खारघर शाळेचा पराक्रम !!  एकाच दिवशी २८ विद्यार्थ्यांना अवैधरित्या जबरदस्तीने दिले  "लिव्हिंग सर्टिफिकेट" !!  पालकांना आपल्या हक्कांसाठी, विद्यार्थी हक्कांसाठी लढण्याचा हक्क घटनेने दिला आहे आणि खारघर मधील शेकडो पालकांनी ह्याच हक्काचा उपयोग करीत विश्वजोत शाळेने अवैधरित्या वाढविलेल्या फी च्या विरोधात लढा सुरू केला. शेकडो पालक २०१८ पासून ह्या वाढीव फी बाबत भांडत आहेत, मिटिंग होत होत्या पण नियमानुसार शाळेच्या मुख्याध्यापिका आणि अधिकृत अधिकाऱ्यांनी मिटिंग ला बसायला हवं पण पालकांसोबत मार्केटिंग वाले आणि ज्यांना फी बाबत कोणताही अधिकार नाही अशा लोकांना बसविले जाते त्यामुळे ह्या वाढीव फी बाबत कोणताही तोडगा निघाला नाहीय आणि पालक प्रतीक्षेत राहीले आहेत. त्यात गेल्या वर्षांपासून कोविड मुळे शासनाचाच निर्णय आला की ह्या काळात कोणतीही वाढीव फी भरू नये आणि शाळांनी इतर वाढीव शुल्क लावू नये तरीही ह्या शाळेने अतिरिक्त फी लावली आणि मागील फी या इ आत्ताची फी असे मिळून लाखोंच

न्हावा बेट पर्यटन प्रकल्प थांबवा - पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

  सिडकोच्या पर्यावरण धोरणात गोंधळ - पर्यावरण प्रेमी मुंबई: उरण तालुक्यातील न्हावा बेटाला पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याच्या सिडको योजनेला थांबविण्याचे आवाहन पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. उरण क्षेत्र हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असून असे प्रकल्प पर्यावरणावर विपरीत परिणाम करत असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.    न्हावा बेटाचा 60 हेक्टर भूभाग (आझाद मैदानाच्या सहा पट) विकसीत करण्याच्या अनुषंगाने सिडकोने अलीकडेच एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय)करिता सार्वजनिक सूचना जारी केली.   “आम्ही कोणत्याही स्वरुपाच्या विकासाविरोधात नाही. प्रकल्प उभे राहताना ते पर्यावरणाशी खेळतात हा आमचा मुख्य मुद्दा आहे,” असे नाटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले.   न्हावा बेटाची नोंद रिजनल पार्क झोन (प्रादेशिक उद्यान क्षेत्र) म्हणून करण्यात आल्याचे सिडकोने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेत नमूद केले आहे.   जनतेच्या सहभागासोबत संपूर्ण नवी मुंबई विकास आराखड्याची सखोल तपासणी करण्यात यावी ही नाटकनेक्टची मागणी आहे. ही तपासणी होईपर्यंत पर्यावरणावर परिणाम करणारी सर्व कामे स्थगित करण्य

शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द--पालकमंत्री अदिती तटकरे

  अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका):- पेण शासकीय तंत्रनिकेतन संस्थेस भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती. इमारत, विद्यार्थी, संस्था चालक यांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी, दुरुस्तीचे प्रस्ताव याबाबत सविस्तर चर्चा होऊन एक स्वतंत्र बैठक संबधीत विभागाकडे घेण्यात येईल. जिल्ह्यातील शासकीय शैक्षणिक संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पेण येथे केले.     पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी पेण येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेस आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.      यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नायब तहसिलदार सुनिल जाधव, प्रा.डॉ.भामरे, दयानंद भगत, उदय जवके, संतोष शृंगारपुरे, नगरसेविका वसुधा पाटील, बंड्याशेठ पाटील, जि.प. सदस्य हरिओम म्हात्रे, नगरसेवक निवृत्त पाटील, प्रतिभा जाधव, पांडुरंग जाधव, जितू ठाकूर, वडखळ चे सरपंच राजेश मोकल, दुष्मी च्या सरपंच रश्मी भगत आदि उपस्थित होते.      पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, या संस्थेत 800 पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडतात, ही चां

नि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल- मुख्यमंत्री

  बहृन्मुंबई महानगरपालिका व मे. आय डी ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सामंजस्य करार*  मुंबई दिनांक २८   मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प  सुरु करणे हे महत्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त रुप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे असे प्रातिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि.  यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर,   इस्त्राईलचे महावाणिज्यदुत याकोव फिनकेलस्टाईन, वकालतीमधील अन्य सदस्य, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलीजीजचे  पदाधिकारी,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस श्रीनिवास यांच्यासह

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 726 बूथवर 60971 हजाराहून अधिक मुलांना पल्स पोलिओ लसीकरण

  नवी मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या वतीने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये याठिकाणी 607 स्थायी बूथ तसेच रेल्वे स्टेशन, बस डेपो, मॉल, डि मार्ट अशा 92 ठिकाणी अस्थायी बूथ तसेच दगडखाणी, उड्डाणपूलाखाली, रेल्वेलगत असलेल्या झोपड्या, बांधकाम ठिकाणे अशा ठिकाणी 28 मोबाईल बूथ अशाप्रकारे विविध जागी एकूण 726 लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. 5 वर्षाखालील साधारणत: 87 हजार लाभार्थी बालके नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.       सकाळी 8 ते सायं. 5 या वेळेत दिवसभरात नवी महानगरपालिका क्षेत्रात 5 वर्षाखालील 60 हजार 971  बालकांनी पल्स पोलीओ लसीकरणाचा लाभ घेतला. ज्या संभाव्य लाभार्थी बालकांचे काही कारणांमुळे लसीकरण झालेले नाही त्यांच्याकरिता इन्टेन्सिफाईड पल्स पोलीओ लसीकरण मोहीम हाती घेण्यात येत असून दि. 28 जून ते 2 जुलै 2021 या कालावधीत

नियमित लोकसंपर्क असणा-या जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन

  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना घरापासून जवळच कोव्हीड लस घेता यावी याकरिता लसीकरण केंद्र संख्येत सातत्याने वाढ करण्यात आली असून सध्या 78 केंद्रे कार्यान्वित आहेत व लस उपलब्धतेनुसार त्यामध्ये आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने जागांची निवड करून ठेवत संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासोबतच लसीकरणापासून कोणताही घटक वंचित राहू नये याची काळजी घेत 18 वर्षावरील कॉरी क्षेत्रात राहणारे कामगार तसेच बेघर निराधार व्यक्तींचेही लसीकरण करण्यात येत आहे.       तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेता 31 जुलैपर्यंत 45 वर्षावरील नागरिकांना लसीचा किमान पहिला डोस देऊन संरक्षित करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती तसेच आशा स्वयंसेविकांना प्रतिव्यक्ती 10 रूपये विशेष भत्ता देत लसीकरणाचा वेग वाढविला जात आहे.       अशाप्रकारे विविध घटकांच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जात असताना ज्या व्यक्तींचा सेवा पुरविताना अनेक व्यक्तींशी नियमित संपर्क येतो अशा कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींसाठी (Potential Superspreaders) महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार

सेंट जोसेफ हायस्कूलची दादागिरी; फी न भरणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून बाहेर काढलं; जाब विचारायला गेलेल्या पालकांना शाळेत कोंडलं

  पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूलकडून फी न भरणार्‍या 300 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत शाळेत विचारणा करायला गेलेल्या पालकांना देखील शाळेने बंद करून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर पालकांना बाहेर सोडले गेले. कोरोना काळात शाळेची फी वाढ न करण्याचा राज्य सरकारचा आदेश असताना अनेक शाळांकडून याला केराची टोपली दाखवली जात आहे. नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेने तर फी न भरणार्‍या 300 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात बाहेर काढल्याचा आरोप पालकांनी केला. याबाबत सकाळी 8 वाजता शाळेत जात विचारपूस केली असता पालकांनाच शाळेच्या आवारात बंद करून ठेवले गेले. फी बाबत काही तो निर्णय घ्या आणि नंतरच शाळेच्या बाहेर जा, असा अजब पवित्रा शाळेने घेतला होता. शाळेचे मुख्य गेटलाच कुलूप लावल्याने शाळेत गेलेल्या पालकांना बाहेर जाता येत नव्हते. शाळेच्या या दादागिरी विरोधात काही पालकांनी गेटबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी शाळेत येऊन हस्तक्षेप करत पालकांना बाहेर काढले. त्यावेळी कोरोना

मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती दुबार, नाव वगळणी करुन घेण्यासाठी तहसील कार्यालय पनवेल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

  पनवेल : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील सर्व विधानसभा मतरसंघाच्या छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत १०० टक्के शुध्द मतदार यादी तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मतदारांनी मतदार यादी शुध्द करण्यासाठी नाव नोंदणी, दुरुस्ती दुबार नाव वगळणी करुन घेण्यासाठी संबंधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.ए.ल ओ.) तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.          १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण ५७० मतदार यादीभाग आहेत. त्यापैकी २५७ यादीभागातील ४४ हजार ११२ मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच १९० उरण विधानसभा मतदारसंघातील तालुका पनवेल अंतर्गत १२४ यादी भाग असुन त्यामध्ये २ हजार २२ मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदार यादीत नाही. अशा मतदारांनी आपले रंगीत फोटो ३० जुन पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी / तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिलदार कार्यालय, पनवेल कार्यालयात जमा केले नाहीत तर मतदारांची नावे मतदार यादीतून

पनवेल-सायन महामार्गावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन

  कळंबोली येथे राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी  आरक्षण परत मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही  आमदार प्रशांत ठाकूर यांचा महाविकास आघाडी शासनाला इशारा पनवेल ः प्रतिनिधी मराठा आरक्षणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारने योग्य बाजू न मांडल्याने तसेच त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्यात शनिवारी चक्काजाम आंदोलन केले. या मुद्द्यावरून पनवेलमध्येही राजकारण तापले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे भाजप कार्यकर्त्यांनी पनवेल-सायन महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षणाविरोधातील याचिकेवर 4 मार्च 2021 रोजीच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवले. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका 29 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. यामुळे महारा

रोटरीच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने समाजाची सेवा - आमदार प्रशांत ठाकूर

  पनवेल (प्रतिनिधी) रोटरी क्लबच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने समाजाची जी सेवा होते, त्याबद्दल कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नाहीत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज(शुक्रवार, दि. २५) खांदा कॉलनी येथे  रोटरी क्लबच्या कार्यक्रमात केले.       रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन सिनर्जी पार्टनर्स आणि नेत्र ज्योत आय हॉस्पिटल, खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि  वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास रोटरी ३१२१ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.रश्मी कुलकर्णी, डीआरएफसी रो. डॉक्टर गिरीश गुणे, आयकर आयुक्त संजय देशमुख, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, क्लब अध्यक्ष हार्मेश तन्ना, सचिव कल्पेश परमार, प्रोजेक्ट संपर्क डॉक्टर एन. सी.जनार्दन, नेत्रज्योत आय हॉस्पिटलचे ट्रस्टी, डॉक्टर, इतर क्लबचे अध्यक्ष व रोटेरियन उपस्थित होते.        यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर  यांनी आपण या क्लबचे सदस्य असल्याचा मला अभिमान वाटत असून  त्याच्य

कोव्हीडमुळे पालकांचे छत्र हरविलेली मुले तसेच पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा मदतीचा हात*

  कोव्हीडच्या पहिल्या व दुस-या लाटेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून त्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई व वडील असे दोन्ही पालक अथवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू होऊन मुले अनाथ झालेली आहेत. त्याचप्रमाणे कोव्हीडमुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीला कौटुंबिक व आर्थिक हानीला आकस्मिकरित्या सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.       अशा अनाथ बालकांची तसेच कोव्हीडमुळे पतीचे आकस्मिक निधन झालेल्या महिलांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. अशी बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही महानगरपालिकेची सामाजिक बांधिलकी आहे हे लक्षात घेत अशा संकटकाळात अनाथ मुलांना तसेच पती गमावलेल्या पत्नीला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.       (अ) कोव

पारसिक हिल खाणकाम पुन्हा सुरू करण्याची कल्पना भयावह - पर्यावरण प्रेमीं

 प्रकल्पग्रस्तकरिता दूग्ध उद्योगाप्रमाणे सहकारी तत्त्वावर पर्यायी जागेची शिफारस नवी मुंबई: शहराच्या मध्यवर्ती भागात पारसिक हिल भागात खाणकाम सुरू करण्याची घोषणा अलीकडेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र त्यांच्या या घोषणेला पर्यावरणप्रेमींकडून कडाडून विरोध करण्यात आला. एनजीओ नाटकनेक्ट फाउंडेशन’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नवी मुंबईपासून दूर अंतरावर पर्यायी जागेची शिफारस खाणकामाकरिता करण्यात आली. या सुचविण्यात आलेल्या जागेवर मनुष्य वस्ती नाही. या भागातील उत्खनन कार्य हे सहकारी तत्वावरील दूग्ध उद्योगाप्रमाणे सहकारी तत्त्वावर राबविणे शक्य आहे. जेणेकरून प्रकल्पबाधित व्यक्तिंना मदत मिळेल, असे नाटकनेक्टचे संचालक बी एन कुमार म्हणाले. पारसिक डोंगराच्या भागातील खाणकाम स्वत: दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी थांबविले होते. या भागातील उत्खननाचा फटका शहरातील पर्यावरणाला बसून अनर्थ घडू शकतो हे त्यांनी वेळीच ओळखले होते. कालांतराने डोंगर भागात सुरुंग स्फोट सुरू झाले. मात्र या भागात केवळ 138.07 हेक्टर जागेवर खाणकामाची परवानगी असताना खाण संचालकांनी 264.1 हेक्टर ज

रस्त्यावरील बेघर निराधार व्यक्तींचे कोव्हीड लसीकरण करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका

  नवी मुंबई :कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जात असताना लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्याकरिता लसीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असून वृध्दाश्रम, अनाथाश्रमात असलेले बेडवरील रूग्ण, वृध्द तसेच दिव्यांग व्यक्ती यांच्याकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.       यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे डोक्यावर कोणत्याही प्रकारचे छप्पर अथवा निवारा नसणा-या रस्ते, उड्डाणपुलाखालील जागा येथे आढळणा-या बेघर निराधार व्यक्ती. असे दुर्लक्षित घटक लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जात असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पुढील दहा दिवसात महानगरपालिकेच्या आठही विभागांत निराधार बेघरांसाठी कोव्हीड लसीकरणाची ही विशेष मोहीम राबविली जाणार असून आज बेलापूर विभागापा

खारघर येथील पांडवकड्याच्या डोहात बुडून मुंबईतील तरूणाचा मृत्यू

  काल दि. 22/06/2021 रोजी खारघर पोलीस ठाणे हद्दीत पांडवकडा येथे मानखुर्द गोवंडी येथील शालेय मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, मौसम घरती, राहील खान असे पांडवकडा येथे काल दिनांक 22 6 2021 रोजी संध्याकाळी 03-30 वजेच्या सुमारास आले. त्यात गौरव लोखंडे व राहिल खान तसेच मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या त्यात गौरव व राहील असे वर येऊन मौसम घरती हा वर आला नाही तेव्हा त्यांनी नवी मुंबई कंट्रोल ला कळविले. फायर ब्रिगेड व खारघर पोलिस यांनी पाण्यात गळ टाकून तसेच प्रत्यक्ष शस्वीमरपाठवून त्याचा शोध घेतला परंतु रात्री बॉडी मिळून आली नाही. आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी सदर डोहातील खडका खाली अडकलेले प्रेत बाहेर काढले मयताचे नाव - मौसम रामबहादुर घर्ती वय 18 वर्षे राहणार - मानको मेडिकल जवळ, गोवंडी पश्चिम, मुंबई त्याचे नातेवाईक व इतरांना माहिती दिली असून प्रेत पोस्टमार्टम कामी पाठवण्यात आलेले आहे. खारघर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी पावसाळा सुरू होताच आपले चॅनेल पेपर च्या माध्यमातून पाडंवकडा येथे जाऊन नये तेथे मृत्यु होवु शकतो म्हणून आवाह

शासनाचे सर्व नियम पाळून तिथीनुसार 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

  रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील असलेल्या किल्ले रायगड गडावर आज दिनांक २३ जून रोजी शासनाचे सर्व नियम पाळून  तिथीनुसार किल्ले रायगडावर  348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.  महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, सतीश साळुंखे, रोहित पवार  व इतर अनेक मान्यवर व शिवभक्त यावेळी उपस्थित होते. हिंदू धर्म रीतीप्रमाने विधिवत पूजा यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ  शुद्ध त्रयोदशी या मराठी तिथीनुसार गेली अनेक वर्ष  किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो.  " आजच्या हिंदू तिथी प्रमाणे साजरा होत असलेल्या  शिव राज्याभिषेक दिनास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोष्यारी यांनी ५ लाख रुपयांचा निधी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीकडे सुपूर्त केला आहे. तसेच दरवर्षी तशी रक्कम देणार असून त्यांना हिंदू तिथीप्रमाणे होणारा सोहळा बघायचा आहे व रायगडावर येणार असल्याचे आहे. " असे यावेळी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले. कोकणकडा मित्रमंडळ महाड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज राय

खारघरमध्ये बोगस डाॕक्टरला अटक

  खारघर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल डी मार्ट जवळ से 15 याठिकाणी बिना डिग्री चे बोगस डॉक्टर हे पेशंट्स तपासणी करीत असल्याची माहिती खारघर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना माहिती मिळाली लागलीच पनवेल महानगर पालिकेचे डॉक्टर यांना बोलवून सदर हाॅस्पीटल येथे बनावट पेशंट्स ला पाठविण्यात आले त्यास कुठलाही आजार नसताना तेथे असलेल्या बनावट डॉक्टर ने त्याच्या खाली असलेल्या मेडिकल स्टोअर मधुन औषधी आणायला सांगुन 1,000 रू चेकअप फि घेतली त्यानंतर खारघर पोलिसांनी सदर हाॅस्पीटल येथे छापा मारून बनावट बोगस डॉक्टर आरोपी नामे रोहित गुप्तेश्वर यादव वय 27 वर्ष यास ताब्यात घेवुन त्याची सखोल चौकशी करता त्याने गोवंडी शिवाजीनगर मानखुर्द येथे कंपाऊंडर चे काम केले असुन येथे तो RMO म्हणून पेशंट्स तपासात असल्याचे निष्पन्न झाले त्यास सहपोनि पाटील यांनी अटक केली असुन मा कोर्टाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवले आहे या बोगस डॉक्टर ने किती पेशंट्स तपासुन चुकीचे औषधोपचार केले असतील त्यामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला तर करोनाच्या नावाखाली पेशंट्स दगावले असे सांगून खारघरवासीची लुट  फसवणूक खारघर मल्टीस्पेशालिटी

अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचा-यांची हयगय न करता कडक कारवाई होईल - आयुक्त श्री अभिजीत बांगर

  नवी मुंबई :अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनाला बाधा पोहचत असून अशा इमारतींमध्ये आयुष्याची कमाई गुंतविणा-या नागरिकांचीही फसवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते. त्यामुळे माफीया वृत्तीने अनधिकृत बांधकामे करणा-यांविरोधात धडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले. अशा बांधकामांकडे कोणी हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचा-यांची हयगय न करता कडक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त श्री. अमरिश पटनिगिरे तसेच सर्व विभागांचे अतिक्रमण विभागाचे अभियंते आणि वेबसंवादाव्दारे सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी उपस्थित होते.       व्यवस्थेला गृहित धरून होत असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट करीत आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले.       य

दिबासाहेबांच्या नावाला वाढता पाठिंबा- वारकरी महामंडळ, व्यापारी संघ, उरण वारकरी सांप्रदाय यांनीही दिला पाठिंबा

  पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य, पनवेल महापालिका व्यापारी संघ, तसेच उरण तालुका वारकरी सांप्रदाय सामाजिक मंडळाने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय सर्व पक्षीय कृती समितीला जाहीर पाठिंबा दिला आहे.          पनवेल येथे झालेल्या बैठकीत वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य, पनवेल महापालिका व्यापारी संघ, तसेच उरण तालुका वारकरी सांप्रदाय सामाजिक मंडळाने पाठिंबा पत्र दिले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, कॉ. भूषण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादीचे गुलाबराव वझे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.            वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्यच्यावती

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा उद्या बंद राहणार

नवी मुंबई : मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात बुधवार दिनांक 23 जून 2021 रोजी पाणी पुरवठा संध्याकाळी होणार नाही.          तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्याचे काम करत असल्यामुळे सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहील व‌ तसेच  24 जून 2021 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची नोंद घ्यावी.        नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा वापर जपून व काटकसरीने  करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.   

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण- जिल्हाधिकारी निधी चौधरी

अलिबाग,जि.रायगड, दि.21 (जिमाका):-  आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक/ युवतींना  हेल्थ केअर, मेडिकल व नर्सिंग क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता  विकास अभियान अंतर्गत "मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.       हा  प्रशिक्षण कार्यक्रम “On Job Training” या तत्वावर राबविण्यात येणार आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी निवड केलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांना MSCVT/SSC यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.         या योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त लाभ इच्छुक उमेदवारांनी  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdtZpvLGa31Rp7YevA7_iSIgYX0zgv3E98us8jYcSx9YawF8A/viewform?usp=sf_link  या गुगल फॉर्म लिंकवर आपली माहिती भरुन घ्यावा, तसेच ही माहिती जास्तीत जास्त गरजू उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योज

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने योग दिन साजरा

खारघर (प्रतिनिधी)-  युवाप्रेरणा सामाजिक संस्था, भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडल व सुमन्स ऐरोबीकस अँड योगा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल सेक्टर 19,खारघर येथे जागतिक योग दिनानिमित्त योगासने करत योग दिन साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी रघुनाथ ताटे (राधाजीवन दास)  नित्यानंद गौरंग योग & वैल्यू एजुकेशन स्कूल यांनी उपस्थित सर्वांना योगासने शिकवत योगाचे महत्त्व सांगितले. सदर योग शिबिराचे आयोजन नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केले होते. शिबिराचे उदघाटन भाजपा खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील,सुमन हेगडे ,दिलीप जाधव यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आले. आजच्या या योग शिबिरात खारघर मधील आंतरराष्ट्रीय स्थरावरील टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने देखील उपस्थित राहत योगासनांचे धडे घेत योग शिबिरात आपला सहभाग नोंदवला. सदर योग शिबिरात भाजपा खारघर तळोजा मंडल सरचिटणीस दिपक शिंदे , भरत कोंढाळकर, मुकेश गर्ग, शोभा मिश्रा, निर्मला आळेकर, हे उपस्थित

सहकारी संस्थेने लेखापरिक्षण 31 जुलै पर्यंत पुर्ण करावे

ठाणे दि.21 (जिमाका) :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1)(अ) नुसार प्रत्येक सहकारी संस्थेने प्रत्येक वर्षांचे वैधानिक लेखापरिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त केलेल्या सहकार विभागाच्या नामतालीकेवरील लेखापरिक्षकांकडून अथवा निबंधकाने नियुक्त केलेल्या लेखापरिक्षकांकडून दि. 31 जुलै पर्यंत पुर्ण करुन घेणे आवश्यक आहे.  ज्या सहकारी संस्था, सन 2020-21 चे वैधानिक लेखापरिक्षण दि. 31.07.2021 पुर्वी पुर्ण करुन घेण्यास असमर्थता दर्शवतील अथवा टाळाटाळ करतील किंवा संबंधित लेखापरिक्षकांस विहीत मुदतीत लेखापरिक्षणासाठी दप्तर उपलब्ध करुन देण्यास कुचराई करतील अशा सर्व सहकारी संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार संस्था नोंदणी रद्द करणे, संचालक मंडळ बरखास्त करणे, संबंधित अधिकारी/पदाधिकारी पदावर राहण्यास अपात्र ठरणे तसेच संबंधितांवर उचित कायदेशिर शिक्षा व आर्थिक स्वरुपाचा दंड ई. स्वरुपाची निबंधकांकडून कारवाई करण्यात येईल. सर्व वैधानिक लेखापरिक्षकांनी यांनी (सनदी लेखापाल/फर्म/प्रमाणित लेखापरिक्षक) त्यांची नियुक्ती झालेल्या संस्थेचे सन 20

दिबासाहेबांच्या नावासाठी संघर्षाचा लढा कायम राहणार- २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी

मुख्यमंत्र्यांनी लोकभावना समजूनच घेतल्या नाहीत  दिबासाहेबांच्या नावासाठी आम्ही केंद्रातही जाणार आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अँक्शन मोडवर असेल तर आम्ही रिअँक्शन मोडवर असणार  पनवेल(प्रतिनिधी) रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे दुसऱ्या फेरीची चर्चाही फिसकटली आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली हि भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त गावांवर अन्यायकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हेकेगिरी भूमिकेला आमचा प्रखर विरोध असून प्रकल्पग्रस्ताचे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी घोषित करण्यात आलेले २४ जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे, अशी रोखठोक भूमिका लोकनेते  दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने आज (दि.२१ जून) येथे आयोजित करण्यात पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसमोर मांडली.आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अँक्शन मोडवर असेल तर आम्ही रिअँक्शन मोडवर

जागतिक योग दिन उत्साहात साजरा-सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

पनवेल(प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात योग प्रशिक्षक अर्चना शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांनी योगसाधना केली, तर सूर्यनमस्कार स्पर्धेसही योगप्रेमींकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास महापालिका स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक नितीन पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सचिव चिन्मय समेळ, भाजप तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अयुब अकुला आदी उपस्थित होते. गटनिहाय विजेते महिला ः 12 ते 21 वर्षे - प्रथम जयश्री लांडे, द्वितीय प्रियांका जोमराज, तृतीय अनघाश्री एस., चतुर्थ मृण्मयी ठाकूर व प्रणाली माने; 22 ते 35