Skip to main content

कोव्हिड निगेटीव्हचे बनावट रिपोर्टस् बनविणारी टोळी गजाआड ; नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

पनवेल (वार्ताहर) : कुठल्याही प्रकारचे स्वॅब न घेता हजार ते अडीच हजार रुपयांमध्ये कोवीड-19चे थायरोकेअर लॅबचे कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट असल्याचे बनावट रिपोर्ट तयार करुन देणाऱया टोळीतील तिघांना नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने सापळा लाऊन अटक केली आहे.  या तिघांच्या मोबाईलमध्ये अनेक व्यक्तींचे बनावट कोव्हिड टेस्ट रिपोर्ट आढळुन आले आहेत. त्यामुळे या टोळीने अनेकांची बनावट कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट देऊन फसवणुक केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुन्हे शाखेकडून या तिघांची कसुन चौकशी करण्यात येत आहे.   खारघर सेक्टर-35 मध्ये राहणारा साजीद दाऊद उपाध्ये (47) हा अडीच हजार रुपयांमध्ये कोवीड-19चे वेगवेगळ्या लॅबचे बनावट कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन देत असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर यांच्या सुचनेनुसार गत 3 मे रोजी साजीद उपाध्ये याच्याकडे खाजगी व्यक्तीसह एका पोलीस कर्मचाऱ्याला कोव्हिडचे बनावट निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन घेण्यासाठी पाठवून देण्यात आले होते. त्यानुसार या दोघांनी साजीद उपाध्ये याची खारघर सेक्टर-35 मध्ये भेट घेऊन त्याला बनावट कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट बनवून देण्यासाठी आपले आधारकार्ड व मोबाईल नंबर दिले होते. तसेच त्यासाठी 2 हजार रुपये रोख ऍडव्हान्स म्हणुन दिले होते. त्यानंतर साजीद उपाध्ये याने दोन दिवसानंतर त्यांना रिपोर्ट घेण्यासाठी येण्यास सांगितले होते.   त्यानुसार गुरुवारी दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे, सहाय्यक फौजदार संजय पवार व त्यांच्या पथकाने खारघर सेक्टर-35 भागात सापळा लावला. यावेळी साजीद उपाध्ये याने तयार केलेले थायरोकेअर लॅबचे बनावट कोवीड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट खाजगी व्यक्तीला दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याला अनिकेत दुधावडे (21) याने सदरचे निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन दिल्याचे सांगितले.   त्यानुसार पोलिसांनी अनिकेत दुधावडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर राहुल पांडे (23) याने सदरचे रिपोर्ट तयार करुन दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेऊन तिघांवर खारघर पोलीस ठाण्यात फसवणुक व बनावट रिपोर्ट तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. न्यायालयाने या तिघांची येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.   चौकट   या कारवाईत अटक करण्यात आलेला साजीद उपाध्ये हा कोवीड-19चे बनावट निगेटीव्ह रिपोर्टची गरज असलेल्या गिऱहाईकांचा शोध घेऊन त्यांची माहिती तो अनिकेत  दुधावडे याला देत होता. त्यानंतर अनिकेत, राहुल पांडे याला सदरची माहिती देऊन त्याच्याकडून संबधित व्यक्तींचे थायरोकेअर लॅबचे कोवीड-19चे बनावट निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन घेत होता.   एक बनावट टेस्ट रिपोर्ट तयार करुन देण्यासाठी हि टोळी एक हजार ते अडीच हजार रुपये संबधितांकडून घेत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या तिघांच्या मोबाईलमध्ये अनेक व्यक्तींचे बनावट टेस्ट रिपोर्ट आढळुन आले आहेत. त्यामुळे या तिघांनी अशाच पद्धतीने अनेक व्यक्तींना बनावट कोव्हिड टेस्ट रिपोर्ट तयार करुन दिल्याचे तपासात आढळुन आले आहे.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...