कोविडमुळे मृत पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार होणाऱ्या स्मशानभूमी मधील कामगारांना सुविधा पुरवा- विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे
पनवेल : कोविडमुळे मृत पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार होणाऱ्या स्मशानभूमी मधील कामगारांना सुविधा पुरविण्याची मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यानी आयुक्तांकड़े केली आहे .
पनवेल शहरची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर नागरी वस्त्याही वाढत आहेत. कोविडमुळे मृत पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्मशान भूमीतील कामगारांना पालिका प्रशासनाने कोणत्याही सोयी सुविधा येथे पुरविलेल्या नाहीत. भर उन्हात येथे देहावर अंत्यसंस्कार केले जातात. येथील कामगारांना स्मशानभूमीमध्ये पंखा, विश्राती करिता खाट, तसेच एनर्जी पेय (ORS) ह्याची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घेता येईल. त्याना व्यवस्थित सुविधा पुरवल्या तर त्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. असे आशयाचे निवेदन पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यानी दिले आहे
Comments
Post a Comment