कुंडेवहाळ, नांदगाव, किरवली, मोहोदर, जांभिवली, केवाळे, सांगडे, वळवली, आदी गावातील नागरिकांना रेशन किटचे वाटप
पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कुंडेवहाळ, नांदगाव, किरवली, मोहोदर, जांभिवली, केवाळे, सांगडे, वळवली, आदी गावातील नागरिकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, कुंडेवहाळ सरपंच सदाशिव वास्कर, राकेश गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते चाहुशेठ पाटील, अनेश ढवळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment