पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः खारघर मधील थ्री स्टार हॉटेल मध्ये अतिरेकी घुसल्याचा संदेश खारघर परिसरात पसरल्याने एकच गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तत्काळ बॉम्ब शोध पथकासह मोठा पोलीस फौजफाटा गोळा झाला. लपलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी सुरु असलेल्या या कोंबिंग ऑपरेशन द्वारे लपलेल्या दोन अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचे चित्र हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांचे झोप उडविणारे होते. मात्र, सदर दृश्य म्हणजे पोलिसांनी केलेले ‘मॉक ड्रील’ होते, असे समजल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
सायन-पनवेल महामार्ग लगत नेहमी गर्दीने गजबजलेल्या खारघर हिरानंदानी पुलजवळील थ्री स्टार हॉटेल मध्ये पोलिसांचे मॉक ड्रील झाले. हॉटेल मध्ये दोन अतिरेकी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली. तत्काळ घटनास्थळी बॉम्ब शोध पथक, श्वान पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, वाहतुक आणि स्थानिक पोलीस या रंगीत तालीममध्ये सहभागी झाले. हॉटेलमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांचा माग काढण्यासाठी पोलीस यंत्रणेने या परिसराची रेकी करुन कारवाई करण्यासाठी ठिकाणे निश्चित केली. त्यानंतर तुकड्यांमध्ये विभागून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले. या कोंबिंग ऑपरेशमध्ये दोन अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. खारघर सेक्टर-7 मधील क्रिस्टल प्लाझा इमारतीत थ्री स्टार हॉटेलसह इतर छोटी हॉटेल, चायनीज शॉप, बँक एटीएम, खानावळ, टुरिस्ट बुकिंग दुकाने मिळून जवळपास 200 दुकाने आणि रहिवासी संकुल आहे. क्रिस्टल प्लाझा इमारती शेजारी रॉयप ट्युलिप हॉटेल, विविध शोरुम असल्याने आणि लागूनच सायन-पनवेल महामार्गावर बस थांबा असल्याने या भागात नागरिकांची गर्दी असते. ‘कोरोना’च्या परिस्थितीत अचानक अतिरेक्यांनी हल्ला केल्यास त्यांचा बिमोड करण्यासाठी सदर रंगीत तालीम घेण्यात आले. यावेळी ‘खारघर पोलीस स्टेशन’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, जलद प्रतिसाद पथक प्रमुख मानसिंग दुबल यांच्यासह आग्नशमन आणि वाहतुक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment