पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या प्रभाव सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यापार्श्वभुमीवर वहाळ येथे डॉ राहुल वंजारी, दिपाली गोडघाटे यांनी ‘एकायन हॉस्पीटल कोविड सेंटर सुरु केले आहे. या सेंटरचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. ०७) उद्घाटन करण्यात आले.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पनवेल तालुक्यातील वहाळ येथे डॉ राहुल वंजारी, दिपाली गोडघाटे ‘एकायन हॉस्पीटल कोविड सेंटर सुरु केले आहे. या सेंटचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी तहसीलदार विजय तळेकर, , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, भाजपनेते संदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, अंकुश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, वहाळ तंटामुक्ती समिती अध्यक्ष सिताराम नाईक, रमेश दापोलकर, वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, डॉ राहुल वंजारी, डॉ दिपाली गोडघाटे, पोलिस अधिकारी इंगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment