Skip to main content

लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिकेतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पनवेल / प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात आपली सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, कर्मचारी, शिक्षिका, डेटा एंट्री ऑपरेटर कर्तृत्ववान महिला यांचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्‍या पनवेल महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा तसेच शिक्षिका, डॉक्टर, नर्सेस व डेटा एंट्री ऑपरेटर यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण अच्चूभाई,महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण कोळी, सचिव मंगेश लाड, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, आशा कि किरण फाउंडेशनच्या को - फाउंडर नूरजहाँ कुरेशी, समाजसेविका विनिता बर्फे, पत्रकार अर्चना सिंग, डॉ. पद्मिनी येवले, डॉ.प्रतीक्षा कांबळे, नवीन पनवेल शहर अध्यक्ष संतोष आमले, ओमकार महाडिक, रहीस शेख आदी उपस्थित होते. *सन्मानित करण्यात आलेल्या पनवेल महापालिकेतील कर्तृत्ववान महिला तथा कोविड योद्धा :* स्वप्नाली चौधरी (समाज विकास अधिकारी), प्रियांका पाटील (विधी अधिकारी), *डॉक्टर :* पद्मिनी येवले, नेहा चंडक, आश्विनी देगावकर, प्रतीक्षा कांबळे, कीर्ती हांपे *नर्स :* प्रियंका वाघ, चैताली शिंदे, स्वप्ना गायकवाड, सुप्रिया परब, शीतल कोराडे(लॅब टेकनीशीयन), वैशाली पाटील (ANM), तेजल सोनवणे (फार्मासिस्ट) *शिक्षिका :* ज्योत्सना भरडा, स्वाती पाटील, वैशाली सोनावणे, वैशाली म्हात्रे, वैशाली पाटील, तनुजा दलाल, विजेता पाटील, योगिता पाटील, शुभांगी चव्हाण, जयश्री रोडे, दिप्ती अंबवणे *डेटा एंट्री ऑपरेटर :* अश्विनी हजारे, पूजा ढवळे, अनिता कुदळे, दक्षता पाटील, प्रतिक्षा पाटील,प्रियांका कोते, मोनिका डाके, रितू कुरंगळे, शितल ढाकणे, सरिता मोरे, शुभांगी पांगारे, रोहिणी नागे, स्नेहा गायकवाड, कृतिका पवार, दिपाली म्हात्रे, जागृती पाटील, वैशाली डुकरे, रुपाली चौधरी, अस्मिता पाटील, दिपिका पाटील, प्रतिक्षा म्हात्रे, हिमानी राजभोज. *सुरक्षारक्षक :* लता काळे, संगीता खामकर, ज्योत्सना घनदाट. 

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.