पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जण संकटात सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत कुणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटायला येऊ नये. ज्यांना आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी फोनवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून द्याव्यात. सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे आणि ते वृद्धिंगत होत राहील, असा मला विश्वास असल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच स्वतःची व कुटुंबाची आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी. आणि देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment