Skip to main content

नैसर्गिक आपत्तीत कोकण विभागाची सज्जता

महाराष्ट्रातील इतर महसूल विभागांच्या तुलनेत कोकण महसूल विभाग अनेक अर्थाने खूप वेगळा आहे.  एकाच वेळी सागरी, डोंगरी, औद्योगिक आणि अधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश, म्हणून  कोकणाचा समावेश होतो.  मुंबई शहर आणि उपनगर हे देखील कोकण विभागात येतात.  मुख्यत: कोकणात जून ते सप्टेंबर पर्यंत मोठयाप्रमाणावर पाऊस असतो.  आणि याच काळात अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी प्रशासनाला खूप अगोदरपासून तयारी करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी परवा आढावा बैठक घेवून कोकण विभगाची तयारी कशी आहे.  याबद्दल माहिती जाणून घेतली. आणि आवश्यक त्या उपययोजना देखील सूचविल्या.   येणाऱ्या पावसाळयात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे. तसेच नागरिकांना वेळीच सूचना मिळतील याची काळजी घ्यावी. हवामान विभागाकडून पाऊस, वादळ व इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्यावत माहिती सातत्याने मिळाली पाहिजे.   त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल.  या काळात समुद्रात दूरवर जाऊन मासेमारी करणाऱ्या बोटींशी संपर्क असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पूर्वतयारी केली आहे. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्हयांचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यन्वीत आहेत.  गतवर्षी तिवरे धरणाची दुर्घटणा घडली.  यंदा तसे होवू नये यासाठी कोकणातील धरणांची देखभाल व दूरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करणे आवश्यक आहे.  धरणा जवळ असणाऱ्या गावातील लोकांना सावध करावे.  नैसर्गिक आपत्तीच्यावेळी त्यांना सुरक्षित जागी हालवण्यासाठी पर्यायी व्यवस्था आतापासूनच करुन ठेवावी.  पालघर मध्ये लहान लहान भूकंप झाले होते.  याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. 2020 मध्ये कोकण विभागात 3 हजार 173 मीमी पाऊस झाला होता.  विभागात 371 पूर प्रवण आणि 223 दरडग्रस्त गावे आहेत.  विभागात जीवरक्षक बोटी, जॅकेट व इतर सामुग्री उपलब्ध आहेत.  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तुकडी चिपळूण येथे तैनात असणार आहे.  यासाठी मॉकड्रील झाले आहे.  कोकण विभागात मुंबई, नवीमुंबई, ठाणे, वसई याठिकाणी लवकरच नवीन रडार उभारण्यात येत आहेत.  त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण आणि अचूक होऊ शकेल.  पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नसायचा.  पण 2017 पासून ओखी, वायू, क्यार, निसर्ग यासारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागाचे खूप नूकसान केले आहे. वीज पडण्याचा धोका हा प्रत्यक्ष पावसाळयापेक्षा अगोदरच्या काळात म्हणजे एप्रिल, मे मध्ये जास्त असतो.  नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हवामानाचा अचूक अंदाज करणे आता शक्य आहे.  कोकण विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मुंबई शहर, उपनगर, ठाणे,रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा खरीप पूर्व कामांचा आढावा सादर केला.  मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रात यासाठी मुंबई महापालिका विशेष काळजी घेते.  भरतीचे पाणी तुंबू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.   सर्वसाधारणपणे या पावसाळयात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येतील. भरतीचे 18 दिवस आहेत.  मुंबईत जर यादिवशी जास्त पाऊस पडला, तर समुद्रातील भरतीमुळे उधाण पावसाचे पाणी समुद्रात वाहूनजाऊ शकत नाही.  त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते.   भरतीचे दिवस सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे असतील.  बुधवार 23 जून सकाळी 10.53 भरतीची उंची 4.57 मीटर, गुरुवार 24 जून सकाळी 11.45 भरतीची उंची 4.77 मीटर, शुक्रवार 25जून दुपारी 12.33 भरतीची उंची 4.85 मीटर, शनिवार 26 जून दुपारी 1.23 भरतीची उंची 4.85 मीटर, रविवार 27 जून दुपारी 2.10 भरतीची उंची 4.76 मीटर, सोमवार 28 जून दुपारी 2.57 भरतीची उंची 4.61 मीटर, शुक्रवार 23 जुलै सकाळी 11.37 भरतीची उंची 4.59 मीटर, शनिवार 24 जुलै दुपारी 12.24 भरतीची उंची 4.71 मीटर, रविवार 25 जुलै दुपारी 01.07 भरतीची उंची 4.73 मीटर अशी राहील. कोकण विभागातील आपत्ती काळात चोवीसतास कार्यरत असणारे विभागीय आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष पुढील प्रमाणे आहेत. कोंकण भवन, नवी मुंबई -  022-27571516, मुंबई शहर- 022-22664232, मुंबई उपनगर- 022-26556799/26556806, ठाणे-022-25301740/25381886,पालघर -0252597474, रायगड-02141-222118-222097, रत्नागिरी-02352-226248, सिंधुदुर्ग-02362-228847 /228608. पावसाळयापूर्वी  करावयाची कामे जनतेने तातडीने पूर्ण करुन घ्यावीत. तसेच या काळात शासन आपल्यासाठी तसेच याकाळात शासन आपल्यासाठी सज्ज असल्याचेही मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकारे यांनी बैठकीत स्पष्ट् केले.   एकूणच येणाऱ्या काळात कोकण विभागातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज  झाल्या आहेत.    प्रविण रा.डोंगरदिवे        माहिती सहाय्यक     विभागीय माहिती कार्यालय      कोकण विभाग, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.