पनवेल(प्रतिनिधी) नागरिकांना होणाऱ्या मनस्तापाचा विचार करून खारघरमधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी देऊ नये, अशी मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खारघर सेक्टर १२ मधील गोखले शाळेला कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी न देण्याबाबत नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृहनेते परेश ठाकूर यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना कार्यवाहीसाठी निवेदन दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मागील वर्षी गोखले शाळेमध्ये कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र सुरू केले होते. त्यावेळी येथील स्थानिक नागरिकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागला होता. कैद्यांना भेटायला येणारे नातेवाईक, कैद्यांना येथे आणून सोडून जाणारे पोलीस कर्मचारी, कायदेशीर सल्ला देणारे वकील या सर्वांची होणारी गर्दी व त्यांच्या वाहन पार्किंगमुळे होणारा वाहतूक अडथळा, या सर्व कारणांमुळे येथे नेहमीच छोटेमोठे वाद झालेले आहेत. या सर्वांचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. मागच्या वेळची स्थिती वेगळी असल्याने नागरिकांकडून सहकार्य झाले केले होते, परंतु या वेळची परिस्थिती वेगळी आहे. मागील एक महिन्यापासून कोविड बाधितांची संख्या अतिशय भयावह आहे. त्यात शाळा ही गर्दीच्या व मध्यवर्ती वसाहतीत स्थित आहे परिसरातील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर संसर्गात भर पडण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. या विलगीकरण केंद्रात छोटेमोठे कैदी ठेवले जातात. भविष्यात येथे गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या विषयाचा गांभीर्याने विचार करून गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र सुरु करू नये, असे असे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment