कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून ०१ कोटी ०७ लाख
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना वैश्विक महामारीच्या संकटमय काळात नागरिकांना सातत्याने सर्वोतपरी मदत करणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून पनवेल महानगरपालिकेला ०१ कोटी ०७ लाख रुपयांचा निधी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित केला आहे. या संदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांना प्रस्ताव देण्यात आला होता. तो प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.
पनवेल महानगरपालिका अधिग्रहित एमजीएम कामोठे हॉस्पिटल मधील कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारार्थ व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरीता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी 'कोविड १९' संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीबाबत त्यांच्या आमदार निधीतून ०१ कोटी ०७ लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सदरचा प्रस्ताव सादर झाला आहे. लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल.
मागील वर्षीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किटसाठी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. यावेळी एमजीएम कामोठे हॉस्पिटल मधील कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारार्थ व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी हा निधी दिला आहे, त्यामुळे याचा मोठा फायदा कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे.
Comments
Post a Comment