पनवेल / प्रतिनिधी : ‘कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब -गरजू व्यक्ती यांना दोन वेळचे चांगले अन्न पुरवण्यासाठी 'लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना' सुरु करण्याचा संकल्प श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व आशा कि किरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी केला होता. कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला असून काहींवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. आजही अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी लोक उपाशी झोपत आहेत याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार व आशा कि किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांच्यासाथीने 'लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवेचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्याहस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, आशा की किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, कोकण संध्याचे संपादक दिपक महाडिक, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, अनुराग वाघचौरे, ओमकार महाडिक, रहीस शेख, सतीश झेंडे, बबन बारजगे, आशिष गुप्ता यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment