पनवेल, दि.7 (संजय कदम) ः बेकायदेशीररित्या देशी दारु जवळ बाळगून त्याची विक्री करणार्या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील नवकार लॉजिस्टीक लेबर कॅम्प कसळखंड या ठिकाणी एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारुची विक्री करीत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोडसे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस हवालदार संतोष चिकणे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन कुंदन किशोर सिंग (36) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून संत्रा देशी दारुच्या बाटल्या व इतर ऐवज हस्तगत केला असून त्याच्यावर महाराष्ट्र प्रोव्हीविशन अॅक्ट कलम 65 ई अंतर्गत कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसापासून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष पथकामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे अवैधरित्या व्यवसाय करणार्यांवर धडक कारवाई करण्यात येत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment