खारघर (प्रातिनिधी)- रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त व केंद्रातील मोदी सरकारच्या यशस्वी सलग ७ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खारघर शहरातील कोरोना विषाणूमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू नागरिकांना धान्याचे वाटप श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजपा खारघर यांच्या वतीने उद्योग आघाडी खारघर तळोजा मंडल यांच्या माध्यमातून करण्यात आले.
पनवेल महानगरपालिका प्रभाग ५ चे नगरसेवक मा.सभापती शत्रुघ्न काकडे व स्थानिक नगरसेवक रामजीभाई बेरा, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उद्योग आघाडीचे संयोजक राजेंद्र मामा मांजरेकर, सहसंयोजक सुर्या दुदाम, संदीप कासार व भारतीय जनता पार्टीचे खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले..
सेक्टर 3 4 व 5 मधील शेकडो गरजूंना यावेळी धान्यवाटप करण्यात आले.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment