पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः शासनाच्या आदेशाप्रमाणे आस्थापनाविहित वेळेपेक्षा जास्त वेळ फास्ट फुड चालू ठेवल्याने कामोठे वसाहतीमध्ये दोन जणांविरोधात कामोठे पोलिसांनी कारवाई केली आहे.
विहान चायनीज फास्ट फुड तसेच अलबेक फास्ट फुड या दुकानाच्या चालकांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे आस्थापना विहित वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवून केवळ होम डिलेव्हरी करण्याचे आदेश असतानाही त्यांच्या हॉटेल समोर ग्राहकांची गर्दी जमवून खाद्य पदार्थ विक्री करून पनवेल महानगरपालिका तसेच शासनाच्या नियमांच्या आदेशाचे अवहेलना केल्याबद्दल अतुल बोडवे व संदीप लाखन यांच्या विरोधात भादवी कलम 188, 270 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) सह महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाय योजना सन 2020 चे कलम 11 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 कलम 03 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment