राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांगांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल / प्रतिनिधी : संपूर्ण देशासह राज्य आणि रायगड जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे संपुर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे, परीणामी पनवेल तालुक्यांतीलही दिव्यांग बंधू भगिनींवर देखील उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील विविध घटकातील गरजुंना करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये आदर्श संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या व या नावलौकिकाला साजेसे कार्य सातत्याने करीत असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत दिव्यांग व्यक्तींना तांदूळ, डाळ, कांदे - बटाटे, पीठ, मीठ व साखर आदी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. दिव्यांगांना लॉकडॉऊनच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेता श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण अच्चूभाई,महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण कोळी, सचिव मंगेश लाड, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग व्यक्तींना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल तालुक्यासह कल्याण, उल्हासनगर याठिकाणील दिव्यांग बंधू भगिनी मदत घेण्यासाठी उपस्थित होत्या. मदत मिळाल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर अनोखे हास्य दिसून येत होते. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, सहचिटणीस केवल महाडिक, तालुकाध्यक्ष अमित पंडित, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, ओमकार महाडिक, रहीस शेख, फरहान मणियार, सुनील वरेकर, लखबीर सिंग, अभिषेक गुरव, रुद्र अपंग संघटनेचे रायगड जिल्हाअध्यक्ष गजेंद्र आहिरे, लोकहिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिक सरकार, पत्रकार विनिता बर्फे व अर्चना सिंग आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment