Skip to main content

माथेरान नगरपालिकेमध्ये शिवसेनेला मोठा दणका-शिवसेनेच्या दहा नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल(प्रतिनिधी) थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुलळे तेथील वातावरण अचानक तापले आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह १० नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यपद्धती व नेतृत्व भावल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे या नगरसेवकांनी बोलताना आवर्जून नमूद केले.         माथेरान नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत. त्यापैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते, त्यातील दहा जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यास रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.            या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष/ आरोग्य समिती सभापती), राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम,ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.                    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडीला भाजपनं हा दुसरा झटका दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. 'झोपेत असतानाच एक दिवस हे सरकार पडेल. सरकारची झोपमोड कधीच झाली आहे,' असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 'भाजपमध्ये प्रत्येकाचा सन्मान केला जातो. गुणवत्तेप्रमाणे संधी दिली जाते. त्यामुळं आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानमधील पदाधिकाऱ्यांंनाही योग्य ती संधी दिली जाईल,' असे आश्वासन पाटील यांनी दिलं.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पहिल्या फेरीत बाळाराम पाटील यांनी ३