लोकनेते मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज खारघर प्रभाग क्र.४ मध्ये नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केले गरीब व गरजूंना धान्यवाटप
खारघर(प्रतिनिधी)-नेहमीच गरीब व गरजूंना मदतीचा हात देणारे रायगडचे सुपुत्र लोकनेते मा खासदार रामशेठ ठाकूर यांचा दिनांक २ जून रोजी ७० वा वाढदिवस साजरा होणार आहे त्यानिमित्ताने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय, नोकरी ,कामधंदे,रोजगार बंद असल्यामुळे बिकट परिस्थिती ओढवली आहे ह्यातच एक मदतीचा हात म्हणून आदरणीय लोकनेते आमचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूर साहेब ह्यांचा वाढदिवस हा समाज उपयोगी, लोकहितवादी कार्यक्रम राबवत साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्र.४ च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आपल्या प्रभागातील गरीब व गरजूंना मोफत अन्न धान्य वाटप करण्यात आले. सध्य स्थितीत अनेक दुकाने अथवा व्यवसाय बंद आहेत याची जाणीव ठेवत खारघर मधील लॉड्री व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेडसावत होता ही बाब लक्षात घेत खारघर शहरातील सर्वच लॉड्री व्यवसायिकांना देखील अन्न धान्यचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दिपक शिंदे, उद्योग आघाडीचे संयोजक राजेंद्र उर्फ मामा मांजरेकर, भरत कोंढाळकर, खारघर लॉड्री असोसिएशनचे संस्थापक हनुमंत पवार, भाजपचे संदीप एकबोटे,शेखरसिंग चौव्हान, स्मिता आचार्य, अल्पना डे, मेघनाथ ठाकूर, पंढरीनाथ ठाकूर, विजय ठाकूर, संदीप कासार यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment