पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक ३० मे रोजी केवाळे, चिखले, वाजे ग्रामपंचायत, सांगडे, कामोठे गुरुद्वारा, चिंचपाडा वाडी, कोल्ही(कोपर), दापोली, कुंडेवहाळ, कोळखे, नांदगाव, तळोजा फेज १, भानघर, जांभिवली, उसर्ली (रिटघर) आदी गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment