पनवेल / संजय कदम :-
अमरधाम रोड वरील व अंकिता सोसायटी समोरील असलेला अशोक बाग मधील राहणारे रहिवाशी ड्रेनेज च्या विषया वरून त्रस्त होते.पनवेल नगर परिषद असलेल्या काळापासून काही ठिकाणी असलेली ही सांडपाण्याची व्यवस्था काळानुरूप बदल न केल्यामुळे कुचकामी ठरत आहे आणि त्याचा नाहक त्रास रहिवाशांना होत आहे.हीच परिस्थिती अशोकबाग मध्ये सुद्धा होती.छोटे ड्रेनेज चे चेंबर्स, आठ आठ दिवसांनी तुंबणारे पाणी,सांडपाण्याची येणारी दुर्गंधी यासर्व गोष्टींच्या मुळे अशोक बाग मधील रहिवाशी त्रस्त झाले होते.या बाबत अनेक वेळा महानगरपालिकेत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करूनही त्यांचा प्रश्न सुटत नव्हता.शेवटी याबाबत ची तक्रार अशोक बाग च्या रहिवाशांनी नगरसेवक तसेच माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडे त्यांच्या जनसेवा कार्यालयात येऊन केली.अशोक बाग मधील रहिवाशांचा आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सर्व त्वरित पाऊल उचलत कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतले व स्वखर्चाने ड्रेनेज बांधून दिले. आपल्या या प्रलंबित प्रश्नाचे निरसन करून दिलासा दिल्याबद्दल अशोक बाग मधील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment