खारघर :सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय खारघर यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग नावीन्यपूर्ण उपक्रम नेहमीच राबवत असते. त्यामधूनच २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिवस साजरा करण्यासाठी श्री.पंकज कुमार यांच्याकडून निसर्ग संवर्धन ची माहिती मिळवली.पृथ्वीवरील ज्या संसाधनांचा मानव उपयोग करतो त्या तयार होण्यासाठी हजारो लाखो वर्षे लागतात.परंतु आपण काही क्षणांमध्ये ती संसाधने संपवतो.
जसे की जमिनीमधील पाण्याची पातळी १ मीटर ने वाढण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. पण आपण एका दिवसात कोटयावधी लिटर पाणी दुरुपयोग करून वाया घालवतो.प्लास्टिक ही पर्यावरणाचा नाश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे.तसेच एक दीड टन क्षमतेचा एसी एका वर्षाला १३०० किलो कार्बन उत्सर्जन करतो. पण किमान १० वर्ष आयुष असलेले एक झाड वर्षाला वातावरणातून २२ किलो कार्बन कमी करतो.त्यामुळे वृक्ष आणि जंगले पृथ्वी साठी किती महत्त्वाचे आहेत? हे समजते.
प्लास्टिक,काच या वस्तूंच्या कचऱ्याचा पुनः वापर करावा.कारण त्यांचे विघटन होण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी लागतो.त्यामुळेच प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन केले पाहिजे.तरच मानव प्रजातीचे पृथ्वीवरील आयुष्य वाढेल.आता कोरोना काळात सर्व वाहने,कारखाने बंद असताना वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी झाले होते. वातावरण स्वच्छ झाल्यामुळे अतिशय दूरवरचे स्थाने दिसत होती.
या परिसंवादासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ सुनिता पाल यांनी सर्व स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment