अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- कोविड-19 या आपत्कालीन काळात कोविड रुग्णांसाठी उपयोगी पडावेत यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपच्या तळोजा येथील हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनाला 20 माक सीजन सिलेंडर्स देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी आज (दि.28 मे) रोजी 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकड़े जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले.
यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, हिंदाल्को इंडस्ट्रीजचे सीएसआर चे लहू रौधल उपस्थित होते.
हिंदाल्को इंडस्ट्रीजचे युनिट सीएसआर चे लहू रौधल यांनी यावेळी सांगितले की, आमचे युनिट हेड सोमोजीत डॉन, युनिटचे एच. आर. हेड सुधीर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी आरसीएफ येथील कोविड केअर सेंटरला 20 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले होते. त्यावेळी सांगितल्याप्रमाणे 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यात करोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला. तो ताण कमी व्हावा व रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या हेतूने हे ऑक्सिजन सिलेंडर्स देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार हे ऑक्सिजन सिलेंडर्स जिल्हा सामान्य रुग्णालयास देण्यात आले आहेत.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment