Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त अबोली महिला रिक्षा चालक संघटनेच्या महिलांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल / प्रतिनिधी :  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे असलेली उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत.  यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही तातडीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट या संघटनेच्या महिलांकरीता उपलब्ध करुन दिले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल तर्फे सर्व रिक्षा अबोली चालक महिलांना राजीव गांधीं मैदानात धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अबोली रिक्षा महिला चालक संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व महिलांना धान्य देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थितत होते  तसेच  पनवेल, कळंबोली, कामोठे, कल्याण व डोंबिवलीच्या रिक्षा चालक महिलांना जीवनाशक वास्तूंचा वाटप करण्यात आले. ही मदत मिळाल्याबद्दल अबोली महिला रिक्षा चालक संघटनेतर्फे लोकनेते रा

तळोजा येथील रिक्षाचालकांना तसेच पेठाली व भोईरपाडा जीवनावश्यक अन्नधान्य वस्तूंचे वाटप

तळोजा : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने  तळोजा येथील रिक्षाचालकांना तसेच पेठाली व भोईरपाडा येथे सुद्धा ३८० कुटुंबाना जीवनावश्यक अन्नधान्य वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी वाटप करताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरेश केणी, निर्दोष केणी, आशा बोरशे, बजरंग दलचे गुरुनाथ मुंबईकर, अरुण भोईर, कैलास भोईर आदी. 

कुंडेवहाळ, नांदगाव, किरवली, मोहोदर, जांभिवली, केवाळे, सांगडे, वळवली, आदी गावातील नागरिकांना रेशन किटचे वाटप

पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत.  भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.  त्या अनुषंगाने कुंडेवहाळ, नांदगाव, किरवली, मोहोदर, जांभिवली, केवाळे, सांगडे, वळवली, आदी गावातील नागरिकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले.  यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, कुंडेवहाळ सरपंच सदाशिव वास्कर, राकेश गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते चाहुशेठ पाटील, अनेश ढवळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जण संकटात सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत कुणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटायला येऊ नये. ज्यांना आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी फोनवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून द्याव्यात. सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे आणि ते वृद्धिंगत होत राहील, असा मला विश्वास असल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच स्वतःची व कुटुंबाची आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी. आणि देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. 

छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या आवाहनात मराठा क्रांती मोर्चा रायगड सामील होणार

मराठा क़ांती मोर्चा (पनवेल , उरण , कर्जत , खालापूर , पेण , पाली )रविवार दि 30 मे संध्या 5 वाजता बैठक संपन्न झाली छत्रपती संभाजी महाराजांनी 6 जून रोजी घेतलेल्या आंदोलन हजारोच्या संख्यने सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर मीटिंग मध्ये राज्य समन्वयक  विनोद साबळे , गणेश  कडू, राजेश लाड (कर्जत)संतोष पवार(उरण) रुपेश कदम (पेण) शशिकांत मोरे (खालापूर) कमलाकर लबडे (पनवेल) विकास वारदे पनवेल राजेंद्र भगत, यतीन देशमुख ,अनिल गायकवाड,आदी सह इतर पदाधिकारी सहभागी होते

खारघरमधील गरजू नागरिकांना भाजपाच्या वतीने अन्न-धान्य वाटप

खारघर (प्रातिनिधी)-  रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त व केंद्रातील मोदी सरकारच्या यशस्वी सलग ७ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खारघर शहरातील कोरोना विषाणूमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू नागरिकांना धान्याचे वाटप श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजपा खारघर यांच्या वतीने उद्योग आघाडी खारघर तळोजा मंडल यांच्या माध्यमातून करण्यात आले. पनवेल महानगरपालिका प्रभाग ५ चे नगरसेवक मा.सभापती शत्रुघ्न काकडे व स्थानिक नगरसेवक रामजीभाई बेरा, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उद्योग आघाडीचे संयोजक राजेंद्र मामा मांजरेकर, सहसंयोजक सुर्या दुदाम, संदीप कासार व भारतीय जनता पार्टीचे खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.. सेक्टर 3 4 व 5 मधील शेकडो गरजूंना यावेळी धान्यवाटप करण्यात आले.

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

मुंबई दि ३०: ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.  २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. *पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील*    २०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील. *पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :*   वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यां

लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिकेतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पनवेल / प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात आपली सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, कर्मचारी, शिक्षिका, डेटा एंट्री ऑपरेटर कर्तृत्ववान महिला यांचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्‍या पनवेल महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा तसेच शिक्षिका, डॉक्टर, नर्सेस व डेटा एंट्री ऑपरेटर यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण अच्चूभाई,महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण कोळी, सचिव मंगेश लाड, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र सहचिटणीस

ओवे गाव आणि सेक्टर ३० येथील गरजू नागरिकांना नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने ओवे गाव आणि सेक्टर ३० येथील गरजू नागरिकांना  नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना अल्पसंख्यांक समाजाचे नेते मन्सूर पटेल व  कार्यकर्ते 

जावळे, शिवकर, सावळे, जाताडे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल(प्रतिनिधी ) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने जावळे, शिवकर, सावळे, जाताडे येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.        भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मदतीचा ओघ कायम

पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक ३० मे रोजी केवाळे, चिखले, वाजे ग्रामपंचायत, सांगडे, कामोठे गुरुद्वारा, चिंचपाडा वाडी, कोल्ही(कोपर), दापोली, कुंडेवहाळ, कोळखे, नांदगाव, तळोजा फेज १, भानघर, जांभिवली, उसर्ली (रिटघर) आदी गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.        माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७० वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाले.           भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. 

मा. उपमहापौर विक्रांत पाटील यांनी अशोक बाग मधील ड्रेनेज चा विषय सोडवून नागरिकांना दिला दिलासा.

पनवेल / संजय कदम :- अमरधाम रोड वरील व अंकिता सोसायटी समोरील असलेला अशोक बाग मधील राहणारे रहिवाशी ड्रेनेज च्या विषया वरून त्रस्त होते.पनवेल नगर परिषद असलेल्या काळापासून काही ठिकाणी असलेली ही सांडपाण्याची व्यवस्था काळानुरूप बदल न केल्यामुळे कुचकामी ठरत आहे आणि त्याचा नाहक त्रास रहिवाशांना होत आहे.हीच परिस्थिती अशोकबाग मध्ये सुद्धा होती.छोटे ड्रेनेज चे चेंबर्स, आठ आठ दिवसांनी तुंबणारे पाणी,सांडपाण्याची येणारी दुर्गंधी यासर्व गोष्टींच्या मुळे अशोक बाग मधील रहिवाशी त्रस्त झाले होते.या बाबत अनेक वेळा महानगरपालिकेत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करूनही त्यांचा प्रश्न सुटत नव्हता.शेवटी याबाबत ची तक्रार अशोक बाग च्या रहिवाशांनी नगरसेवक तसेच माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडे त्यांच्या जनसेवा कार्यालयात येऊन केली.अशोक बाग मधील रहिवाशांचा आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सर्व त्वरित पाऊल उचलत कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतले व स्वखर्चाने ड्रेनेज बांधून दिले. आपल्या या प्रलंबित प्रश्नाचे निरसन करून दिलासा दिल्याबद्दल अशोक बाग मधील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्य

सर्व राज्यांमधील फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी कोविड -१९ च्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे

पनवेल / संजय कदम :- ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स यूनियन कडून पुन्हा एकदा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी कोविड -१९ च्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी जोर पकडताना दिसून येते. यूनियन कडून माहिती घेतली असता समजते, देशातील बहुतांश राज्य सरकारांनी, केंद्र सरकार व डी जी शिप्पिंग कडून निर्देश देवून सुद्धा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी कोविड -१९ च्या लसीकरणाला प्राधान्य दिलेले नाही व त्या संदर्भात कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्या संदर्भात चौकशी चे किंबहुना तक्रारींचे कॉल्स, संदेश सतत येत असतात हे सांगताना यूनियनच्या खजिनदार शितल मोरे आग्रहाने हे नमूद करतात की हे कॉल्स जामू काश्मीर पासून ते केरळ पर्यंत प्रत्येक राज्यातून येतायत, ह्याचाच अर्थ असा की कोणत्याही राज्यं सरकारने फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी कोविड -१९ च्या लसीकरणाला प्राधान्य देन महत्वच समजलेल नाही, खूप चिंताजनक आहे हे. यूनियन चे कार्यध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी या संबंधीच जागतिक वास्तव थोडक्यात सांगितले, जागतिक समुद्री वाहतुकीसाठी भारत सीफेरर्सचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. सागरी वाहतूक ही एक अत्याआवश्यक वाहतूकसेवा आहे जी जागति

सामाजिक कर्तव्य भावनेने हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनास दिले 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स

अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- कोविड-19 या आपत्कालीन काळात कोविड रुग्णांसाठी उपयोगी पडावेत यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपच्या तळोजा येथील हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनाला 20 माक सीजन सिलेंडर्स देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी आज (दि.28 मे) रोजी 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकड़े जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले.      यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, हिंदाल्को इंडस्ट्रीजचे सीएसआर चे लहू रौधल उपस्थित होते.      हिंदाल्को इंडस्ट्रीजचे  युनिट सीएसआर चे लहू रौधल यांनी यावेळी सांगितले की, आमचे युनिट हेड सोमोजीत डॉन, युनिटचे एच. आर. हेड सुधीर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली  काही दिवसांपूर्वी आरसीएफ येथील कोविड केअर सेंटरला 20 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले होते. त्यावेळी सांगितल्याप्रमाणे  20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यात करोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला. तो ताण कमी व्हावा व रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या हेतूने हे

महान क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अभिवादन

महान क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, संतोष भोईर, निलेश बाविस्कर, युवा नेते दशरथ म्हात्रे, समीर कदम, अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. 

थ्री स्टार हॉटेल मध्ये पोलिसांनी केले मॉक ड्रील

पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः खारघर मधील थ्री स्टार हॉटेल मध्ये अतिरेकी घुसल्याचा संदेश खारघर परिसरात पसरल्याने एकच गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तत्काळ बॉम्ब शोध पथकासह मोठा पोलीस फौजफाटा गोळा झाला. लपलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी सुरु असलेल्या या कोंबिंग ऑपरेशन द्वारे लपलेल्या दोन अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचे चित्र हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांचे झोप उडविणारे होते. मात्र, सदर दृश्य म्हणजे पोलिसांनी केलेले ‘मॉक ड्रील’ होते, असे समजल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सायन-पनवेल महामार्ग लगत नेहमी गर्दीने गजबजलेल्या खारघर हिरानंदानी पुलजवळील थ्री स्टार हॉटेल मध्ये पोलिसांचे मॉक ड्रील झाले. हॉटेल मध्ये दोन अतिरेकी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली. तत्काळ घटनास्थळी बॉम्ब शोध पथक, श्‍वान पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, वाहतुक आणि स्थानिक पोलीस या रंगीत तालीममध्ये सहभागी झाले. हॉटेलमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांचा माग काढण्यासाठी पोलीस यंत्रणेने या परिसराची रेकी करुन कार

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांगांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल / प्रतिनिधी : संपूर्ण देशासह राज्य आणि रायगड जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे संपुर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे, परीणामी पनवेल तालुक्यांतीलही दिव्यांग बंधू भगिनींवर देखील उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील विविध घटकातील गरजुंना  करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये आदर्श संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या व या नावलौकिकाला साजेसे कार्य सातत्याने करीत असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत दिव्यांग व्यक्तींना तांदूळ, डाळ, कांदे - बटाटे, पीठ, मीठ व साखर आदी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. दिव्यांगांना लॉकडॉऊनच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेता श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण अच्चूभाई,महाराष्ट्र उपाध्यक्ष ना

माथेरान नगरपालिकेमध्ये शिवसेनेला मोठा दणका-शिवसेनेच्या दहा नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल(प्रतिनिधी) थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुलळे तेथील वातावरण अचानक तापले आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह १० नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यपद्धती व नेतृत्व भावल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे या नगरसेवकांनी बोलताना आवर्जून नमूद केले.         माथेरान नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत. त्यापैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते, त्यातील दहा जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यास रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.            या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष/ आरोग्य समिती सभापती), राकेश चौधरी,

मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई,दि.२६-गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी  मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.  देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध  राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची गोवा राज्यातील अवैध मद्य विरुद्ध या महिन्यातील तिसरी मोठी कारवाई आहे.  सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या

लोकनेते मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज खारघर प्रभाग क्र.४ मध्ये नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केले गरीब व गरजूंना धान्यवाटप

खारघर(प्रतिनिधी)-नेहमीच गरीब व गरजूंना मदतीचा हात देणारे रायगडचे सुपुत्र लोकनेते मा खासदार रामशेठ ठाकूर यांचा दिनांक २ जून रोजी ७० वा वाढदिवस साजरा होणार आहे त्यानिमित्ताने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय, नोकरी ,कामधंदे,रोजगार बंद असल्यामुळे बिकट परिस्थिती ओढवली आहे ह्यातच एक मदतीचा हात म्हणून आदरणीय लोकनेते आमचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूर साहेब ह्यांचा वाढदिवस हा समाज उपयोगी, लोकहितवादी कार्यक्रम राबवत साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्र.४ च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आपल्या प्रभागातील गरीब व गरजूंना मोफत अन्न धान्य वाटप करण्यात आले. सध्य स्थितीत अनेक दुकाने अथवा व्यवसाय बंद आहेत याची जाणीव ठेवत खारघर मधील लॉड्री व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा  देखील प्रश्न त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेडसावत होता ही बाब लक्षात घेत खारघर शहरातील सर्वच लॉड्री व्यवसायिकांना देखील अन्न धान्यचे मोफत व

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे आजपासून होणार वाटप

पनवेल प्रतिनिधी: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि. 24)पासून राबविण्यात येणार आहे. यानुसार कोपर (गव्हाण) येथे भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, सरपंच हेमलता भगत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, अनंता ठाकूर, जयवंत देशमुख यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार आहे. याचबरोबर धानसर, तुर्भे, पिसार्वे, करवले, कोयनावेळे येथे संतोष भोईर, चाहूशेठ पाटील, प्रल्हाद केणी; आकुर्ली, आदई, नेवाळीत भूपेंद्र पाटील, शेखर शेळके; चिपळे, भोकरपाडा, बोनशेत, विहिघर, कोप्रोलीत संजय पाटील; हरिग्राम, केवाळेत एकनाथ देशेकर; उसर्ली, शिवकरमध्ये

२२७ कुटूंबांना अन्न धान्याचे किट वाटप

पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते देवचंद बहिरा, युवा मोर्चाचे जिल्हा संघटक प्रतिक बहिरा आणि भारतीय जनता पार्टी तक्का विभागीय कमिटीच्या वतीने रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, भाजी विक्रेते व मच्छी विक्रेते अशा २२७ कुटूंबांना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले.          यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, माजी नगरसेवक संदीप बहिरा. प्रभाग क्र २० चे अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा नेते प्रतिक बहिरा, जितू खुटकर, अतुल बहिरा, संदीप पगडे, जयदास कावळे, स्वरूप मुंबईकर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.         कोरोना वैश्विक महामारी आणि पुन्हा एकदा लॉक डाऊन परिस्थितीत रिक्षाचालक, भाजी व मच्छी विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिलांना अशा हातावर पोट असणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. त्यामुळे त्यांना थोडाबहुत आधार देण्याच्या दृष्टिकोनातून रेशन किट देण्यात आले. 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवेचा शुभारंभ

पनवेल / प्रतिनिधी : ‘कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब -गरजू व्यक्ती यांना दोन वेळचे चांगले अन्न पुरवण्यासाठी 'लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना' सुरु करण्याचा संकल्प श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व आशा कि किरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी केला होता. कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला असून काहींवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. आजही अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी लोक उपाशी झोपत आहेत याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार व आशा कि किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी या

कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून ०१ कोटी ०७ लाख

पनवेल(प्रतिनिधी) कोरोना वैश्विक महामारीच्या संकटमय काळात नागरिकांना सातत्याने सर्वोतपरी मदत करणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून पनवेल महानगरपालिकेला ०१ कोटी ०७ लाख रुपयांचा निधी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित केला आहे. या संदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांना प्रस्ताव देण्यात आला होता. तो प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.           पनवेल महानगरपालिका अधिग्रहित एमजीएम कामोठे हॉस्पिटल मधील कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारार्थ व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरीता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी 'कोविड १९' संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीबाबत त्यांच्या आमदार निधीतून ०१ कोटी ०७ लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती.  त्यानुसार सदरचा प्रस्ताव सादर झाला आहे. लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल.            मागील वर्षीही आमदार

कोविडमुळे मृत पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार होणाऱ्या स्मशानभूमी मधील कामगारांना सुविधा पुरवा- विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे

पनवेल : कोविडमुळे मृत पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार होणाऱ्या स्मशानभूमी मधील कामगारांना सुविधा पुरविण्याची मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यानी आयुक्तांकड़े केली आहे .           पनवेल शहरची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर नागरी वस्त्याही वाढत आहेत. कोविडमुळे मृत पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्मशान भूमीतील कामगारांना पालिका प्रशासनाने कोणत्याही सोयी सुविधा येथे पुरविलेल्या नाहीत. भर उन्हात येथे देहावर अंत्यसंस्कार केले जातात. येथील कामगारांना स्मशानभूमीमध्ये पंखा, विश्राती करिता खाट, तसेच एनर्जी पेय (ORS) ह्याची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घेता येईल. त्याना व्यवस्थित सुविधा पुरवल्या तर त्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. असे आशयाचे निवेदन पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यानी दिले आहे

केएन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात.

पनवेल, दि.8 (संजय कदम) ः कोरोना च्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण विश्‍वाला पुन्हा एकदा वेठीस आणले ,असून कोट्यावधी बाधित झालेल्या पैकी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे ,अशात राज्य सरकारचे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय निवडला आहे त्यामुळे काही गरीब आणि गरजू लोकांवर उपासमारीची वेळ पुन्हा एकदा आली आहे ह्या संकटकाळात केएन फाऊंडेशन आणि त्यांचे फाउंडर समाजसेविका कोमल सुरज खोचरे उर्फ तावरे यांनी अनेकांना मदत करण्याचा आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. केएन फाऊंडेशन (एनजीओ) दिवस-रात्र गरजू आणि गरीब लोकांसाठी कार्य करता येईल यासाठी झटत असतात कोविड-19 गरजू लोकांना या पार्श्‍वभूमीवर शासनाचे पालन करून नर्गिस दत्त नगर झोपडपट्टी वसाहत येथे अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तू याचे वाटप केले तसेच केएन फाऊंडेशन सगळ्यांना आव्हान करत होते घरी राहा सुरक्षित राहा कोरानावर मात करू एकजुटीने , केएन फाऊंडेशन (एनजीओ) यांची फाऊंडर कोमल तावरे   आणि त्यांची टीम आणि  त्यांना मोलाची साथ देणारे राजेंद्र तावरे संदीप वर्मा विनायक तावरे उजेफ शेख सचिन गोरे किरण तावरे

कामोठे पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी ; गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

पनवेल, दि.8 (संजय कदम) ः सध्याच्या कोरोना काळाच्या पार्श्‍वभूमीवर हातावर पोट असलेल्या गरीबांसाठी मदतीचा हात म्हणून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार कामोठे पोलीस ठाण्याच्या वपोनि स्मिता जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी परिसरातील गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. अनेकांना सध्याच्या लॉकडाऊनमुळे घरीच रहावे लागत आहे. कामधंदा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. ही गोष्ट कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी कामोठे परिसरातील गरीब व गरजू निराधार लोकांना 70 ते 80 कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले.

कोव्हिड निगेटीव्हचे बनावट रिपोर्टस् बनविणारी टोळी गजाआड ; नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

पनवेल (वार्ताहर) : कुठल्याही प्रकारचे स्वॅब न घेता हजार ते अडीच हजार रुपयांमध्ये कोवीड-19चे थायरोकेअर लॅबचे कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट असल्याचे बनावट रिपोर्ट तयार करुन देणाऱया टोळीतील तिघांना नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने सापळा लाऊन अटक केली आहे.  या तिघांच्या मोबाईलमध्ये अनेक व्यक्तींचे बनावट कोव्हिड टेस्ट रिपोर्ट आढळुन आले आहेत. त्यामुळे या टोळीने अनेकांची बनावट कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट देऊन फसवणुक केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुन्हे शाखेकडून या तिघांची कसुन चौकशी करण्यात येत आहे.   खारघर सेक्टर-35 मध्ये राहणारा साजीद दाऊद उपाध्ये (47) हा अडीच हजार रुपयांमध्ये कोवीड-19चे वेगवेगळ्या लॅबचे बनावट कोव्हिड निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन देत असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर यांच्या सुचनेनुसार गत 3 मे रोजी साजीद उपाध्ये याच्याकडे खाजगी व्यक्तीसह एका पोलीस कर्मचाऱ्याला कोव्हिडचे बनावट निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट तयार करुन घेण्यासाठी पाठवून देण्यात आले होते. त्यानुसार या दोघांनी साजी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘एकायन हॉस्पीटल कोविड सेंटर' चे उदघाट्न

पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या प्रभाव सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यापार्श्‍वभुमीवर वहाळ येथे डॉ राहुल वंजारी, दिपाली गोडघाटे यांनी ‘एकायन हॉस्पीटल कोविड सेंटर सुरु केले आहे. या सेंटरचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. ०७) उद्घाटन करण्यात आले.     कोरोना रुग्णांची वाढती संख्या  लक्षात घेता पनवेल तालुक्यातील वहाळ येथे डॉ राहुल वंजारी, दिपाली गोडघाटे ‘एकायन हॉस्पीटल कोविड सेंटर सुरु केले आहे. या सेंटचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी तहसीलदार विजय तळेकर, , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, भाजपनेते संदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, अंकुश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, वहाळ तंटामुक्ती समिती अध्यक्ष सिताराम नाईक, रमेश दापोलकर, वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, डॉ राहुल वंजारी, डॉ दिपाली गोडघाटे, पोलिस अधिकारी इंगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ओव्हरहेड क्रेनमधून लोखंडी स्लीड कॉईल पडून कामगाराचा मृत्यू ; क्रेन ऑपरेटर व सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल..

पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः तळोजा एमआयडीसीतील तळोजा स्टील सर्व्हीस सेंटर कंपनीमध्ये ओव्हरहेड क्रेनमधुन लोखंडी स्लीड कॉईल खाली उभ्या असलेल्या कामगाराच्या अंगावर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर कंपनीतील ओव्हरहेड क्रेनवरील ऑपरेटर व सुपरवायझर या दोघांनी काम सुरु असताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी सदर घटनेला या दोघांना जबाबदार धरुन त्यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.   तळोजा एमआयडीसीतील तळोजा स्टील सर्व्हीस सेंटर या कंपनीमध्ये लोखंडी कॉईल पँकिंग करण्याचे काम सुरु होते. त्यासाठी ओव्हरहेड क्रेनमधुन लोखंडी स्लीड कॉईल एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत होते. मात्र यावेळी अचानक ओव्हरहेड क्रेन नादुरुस्त होऊन त्याच्यामधुन लोखंडी स्लीड  कॉईल निसटून ते खाली उभ्या असलेल्या इमादुल इशाउद्दीन गाझी (45) या कामगाराच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत इमादुल गाझी याचा मृत्यू झाल्याने तळोजा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन या घटनेचा तपास सुरु केला होता.   या तपासात कंपनीतील ओव्हरहे

देशी दारु विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात

पनवेल, दि.7 (संजय कदम) ः बेकायदेशीररित्या देशी दारु जवळ बाळगून त्याची विक्री करणार्‍या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. तालुक्यातील नवकार लॉजिस्टीक लेबर कॅम्प कसळखंड या ठिकाणी एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारुची विक्री करीत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोडसे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस हवालदार संतोष चिकणे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन कुंदन किशोर सिंग (36) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून संत्रा देशी दारुच्या बाटल्या व इतर ऐवज हस्तगत केला असून त्याच्यावर महाराष्ट्र प्रोव्हीविशन अ‍ॅक्ट कलम 65 ई अंतर्गत कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसापासून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष पथकामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे अवैधरित्या व्यवसाय करणार्‍यांवर धडक कारवाई करण्यात येत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन तरुणावर प्राणघातक हल्ला

पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेल भागात राहणार्‍या रविंद्र मंडल (35) याला त्याच्या ओळखीतील त्रिकुटाने पैशाच्या देवाण-घेवाणी वरुन बेदम मारहाण करुन तसेच त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सदर मारहाणीत रविंद्र मंडल गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.  त्यानंतर पोलिसांनी तिघा मारेकर्‍यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यापैकी दोघांना अटक केली आहे. सदर घटनेतील गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव रविंद्र मंडल उर्फ लाल्या असे असून त्याचा राजू कुंवर याच्यासोबत पैसे देण्या- घेण्यावरुन वाद झाला होता. राजू कुंवर याला देण्यासाठी असलेले पैसे त्याने दारु पिण्यामध्ये उडवून टाकले होते. त्यामुळे राजू कुंवर, राजू विश्‍वकर्मा आणि त्यांचा तिसरा साथीदार या तिघांनी रविंद्र मंडल याला पनवेल मधील मिरची गल्लीमध्ये अडवून त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी राजू कुंवर याने रविंद्रच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. सदर मारहाणीत रविद्र गंभीर जखमी झाल्यानंतर तिघा मारेकर्‍

लग्न समारंभास शासकीय नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याविरुद्ध तालुका पोलिसांनी केली कारवाई..

पनवेल (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेरे गावातील आताशा रिसॉर्ट वर लग्न समारंभास शासन नियमापेक्षा अधिक लोक जमल्याने तसेच करंबेळी येथील एका लग्न कार्यालयात सुद्धा अधिक लोक जमल्याने तसेच तालुक्यातील बेलवली गाव येथेही अशाच प्रकारे लग्न सोहळ्यात लोक जमविल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. कोविड 19 या संसर्ग जन्य आजाराचा प्रसार होऊ  नये दिवसागणिक वाढणारी रुग्ण संख्या आटोक्यात यावी या करिता महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शासन आदेशाप्रमाणे लग्न समारंभास 25 हुन अधीक लोक जमण्यास मनाई असताना आताशा रिसॉर्ट मध्ये 100 ते 150 लोक या लग्न सोहळ्यास उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. आताशा रिसॉर्ट ला जाताना पनवेल तालुका पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी असून तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना या रिसॉर्ट वर इतक्या गाड्या जात आहेत त्यांना अडवले का नाही असा प्रश्‍न नेरे गावातील जनता करीत आहेत. त्याचप्रमाणे करंबेळी येथे लग्न कार्यक्रमासाठी नागरिक जमवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 9 जणांविरोधात तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच बेलवली येथे सु

नैसर्गिक आपत्तीत कोकण विभागाची सज्जता

महाराष्ट्रातील इतर महसूल विभागांच्या तुलनेत कोकण महसूल विभाग अनेक अर्थाने खूप वेगळा आहे.  एकाच वेळी सागरी, डोंगरी, औद्योगिक आणि अधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश, म्हणून  कोकणाचा समावेश होतो.  मुंबई शहर आणि उपनगर हे देखील कोकण विभागात येतात.  मुख्यत: कोकणात जून ते सप्टेंबर पर्यंत मोठयाप्रमाणावर पाऊस असतो.  आणि याच काळात अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी प्रशासनाला खूप अगोदरपासून तयारी करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी परवा आढावा बैठक घेवून कोकण विभगाची तयारी कशी आहे.  याबद्दल माहिती जाणून घेतली. आणि आवश्यक त्या उपययोजना देखील सूचविल्या.   येणाऱ्या पावसाळयात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे. तसेच नागरिकांना वेळीच सूचना मिळतील याची काळजी घ्यावी. हवामान विभागाकडून पाऊस, वादळ व इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्यावत माहिती सातत्याने मिळाली पाहिजे.   त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल.  या काळात समुद्रात दूरवर जाऊन मासेमारी करणाऱ्या बोटींशी संपर्क असणे आवश्यक आहे. त्यास

गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र नको - सभागृहनेते परेश ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी) नागरिकांना होणाऱ्या मनस्तापाचा विचार करून खारघरमधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी देऊ नये, अशी मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  खारघर सेक्टर १२ मधील गोखले शाळेला कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी न देण्याबाबत नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृहनेते परेश ठाकूर यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना कार्यवाहीसाठी निवेदन दिले आहे.        त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मागील वर्षी गोखले शाळेमध्ये कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र सुरू केले होते. त्यावेळी येथील स्थानिक नागरिकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागला होता. कैद्यांना भेटायला येणारे नातेवाईक, कैद्यांना येथे आणून सोडून जाणारे पोलीस कर्मचारी, कायदेशीर सल्ला देणारे वकील या सर्वांची होणारी गर्दी व त्यांच्या वाहन पार्किंगमुळे होणारा वाहतूक अडथळा, या सर्व कारणांमुळे येथे नेहमीच छोटेमोठे वाद झालेले आहेत. या सर्वांचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. मागच्या वेळची स्थिती वेगळी असल्य

कंटेनरमधून 17 प्रवाशांना बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी केली कारवाई

पनवेल, दि.6 (संजय कदम) ः बॉडी कंटेनरमधून 17 पुरुष इसमांना बेकायदेशीररित्या घेवून जात असताना तळोजा वाहतूक चौकी समोर मिळून आल्याने दोघा जणांविरुद्ध तळोजा पोलिसांनी कारवाई केली आहे. चंदनकुमार रामदेव राय (26 रा.झारखंड) व मुकेशकुमार डागी (रा.झारखंड) या दोघांनी त्यांच्या ताब्यातील बॉडी कंटेनर क्र.एनएल-01-एबी-6278 यामध्ये 17 पुरुष इसमांना बेकायदेशीर घेवून जात असताना तळोजा वाहतूक चौकी समोर तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात आढळून आल्याने त्यांनी शासनाचे निर्गमित केलेल्या आदेशाचा भंग केला. तसेच जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची व घातक कृती करून इतरांचे जिवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणण्याची कृती केली. त्याचप्रमाणे सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घातल्याने त्याच्याविरुद्ध भादवी कलम 188, 186, 269, 270, 336 मोटार वाहन कायदा कलम 66 (1/92) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

कामोठे पोलिसांनी केली फास्ट फुड दुकानावर कारवाई

पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः शासनाच्या आदेशाप्रमाणे आस्थापनाविहित वेळेपेक्षा जास्त वेळ फास्ट फुड चालू ठेवल्याने कामोठे वसाहतीमध्ये दोन जणांविरोधात कामोठे पोलिसांनी कारवाई केली आहे. विहान चायनीज फास्ट फुड तसेच अलबेक फास्ट फुड या दुकानाच्या चालकांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे आस्थापना विहित वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवून केवळ होम डिलेव्हरी करण्याचे आदेश असतानाही त्यांच्या हॉटेल समोर ग्राहकांची गर्दी जमवून खाद्य पदार्थ विक्री करून पनवेल महानगरपालिका तसेच शासनाच्या नियमांच्या आदेशाचे अवहेलना केल्याबद्दल अतुल बोडवे व संदीप लाखन यांच्या विरोधात भादवी कलम 188, 270 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) सह महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाय योजना सन 2020 चे कलम 11 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 कलम 03 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

मुद्देमालाचे मालकी हक्क दाखवून आपल्या वाहनांची ओळख पटवावी ; तळोजा पोलिसांचे आवाहन

पनवेल, दि.6 (संजय कदम) ः तळोजा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या विविध वाहनांच्या मुद्देमालाचे मालकी हक्कासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात योग्य ती कागदपत्रे सादर करून त्याची ओळख पटवावी असे आवाहन तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण यांनी केले आहे. तळोजा पोलीस हद्दीमध्ये भादवी कलम 379, 34 या गुन्ह्यातील आरोपी अमीर अहमद शेख (42 रा.वडाळा मुंबई), दशरथ सिताराम ढमाळ (53 रा.शिवडी, मुंबई), विजय भिमराव भरसाकडे (36 रा.देवीचापाडा, पनवेल) यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाला व्यतिरिक्त अतिरिक्त मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 3 लाख रुपये किंमतीची एक लाल रंगाची त्यावर सफेद रंगाचा पट्टा असलेली ट्रॉली 4 फूट लांब व 8 फुट रुंद, या ट्रॉलीला 4 टायर, 2 एक्सल तसेच 2 लाख रुपये किंमतीची एक भगव्या रंगाची ट्रॉली त्याचप्रमाणे 3 लाख रुपये किंमतीची एक नारंगी व पांढर्‍या रंगाची पट्टी असलेली एक ट्रॉली तसेच 2 लाख रुपये किंमतीची चॉकलेटी रंगाची व त्यावर सफेद रंगाच्या पट्ट्या असलेली ट्रॉली. वरील मुद्देमालाचे मालकी हक्काबाबत संबंधित इसमांना तळोजा पोलीस ठाणे संपर्क क्र.022-27412333 तसेच वपोनि काशिनाथ चव्ह

जागतिक वसुंधरा दिनी ऑक्सिजन मॅन ऑफ दिल्ली सोबत साधला परिसंवाद!

खारघर :सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय खारघर यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग नावीन्यपूर्ण उपक्रम नेहमीच राबवत असते. त्यामधूनच २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिवस साजरा करण्यासाठी श्री.पंकज कुमार यांच्याकडून निसर्ग संवर्धन ची माहिती मिळवली.पृथ्वीवरील ज्या संसाधनांचा मानव उपयोग करतो त्या तयार होण्यासाठी हजारो लाखो वर्षे लागतात.परंतु आपण काही क्षणांमध्ये ती संसाधने संपवतो.      जसे की जमिनीमधील पाण्याची पातळी १ मीटर ने वाढण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. पण आपण एका दिवसात कोटयावधी लिटर पाणी दुरुपयोग करून वाया घालवतो.प्लास्टिक ही पर्यावरणाचा नाश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे.तसेच एक दीड टन क्षमतेचा एसी एका वर्षाला १३०० किलो कार्बन उत्सर्जन करतो. पण किमान १० वर्ष आयुष असलेले एक झाड वर्षाला वातावरणातून २२ किलो कार्बन कमी करतो.त्यामुळे वृक्ष आणि जंगले पृथ्वी साठी किती महत्त्वाचे आहेत? हे समजते.     प्लास्टिक,काच या वस्तूंच्या कचऱ्याचा पुनः वापर करावा.कारण त्यांचे विघटन होण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी लागतो.त्यामुळेच प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन केल