सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन एस एस स्वयंसेवकाचा मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्याचा स्तुतीपर उपक्रम!
खारघर : सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.अश्यातच अनेकांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन एस एस स्वयंसेवकानी पार पाडला.
सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय खारघर च्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कु.निखिल सावंत यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा देशमुख आणि रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-१९ विरुद्ध च्या लढ्यात सहभागी असलेल्या नागरिकांना मास्क आणि सॅनीटायझर चे वाटप केले.परळ आणि टाटा रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरातील बेघर लोक,सफाई कामगार, इमारतींचे पहारेकरी यांना मास्क आणि सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.या वाटप शिबिरामध्ये ५०० मास्क,१०० सॅनीटायझर च्या बाटल्या आणि १ थर्मल स्क्रिनिंग गन यांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.हे शिबिर कोविड-१९ च्या सरकारी सुरक्षा नियमावलीचे पालान करून पूर्ण केले.अश्या निर्णायक परिस्थिती मध्ये देखील सुनियोजित आणि सुरक्षितपणे असा उपक्रम पार पाडणे हे खरंच कौतुकास्पद आहे.
Comments
Post a Comment