पनवेल / प्रतिनिधी : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्यावतीने ७० समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचा संकल्प रचण्यात आला आहे. कोरोना विषाणू संक्रमणाची दुसरी लाट तेजीमध्ये असल्याकारणामुळे राज्य सरकारच्यावतीने एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान कार्यालये व सार्वजनिक वाहतूक सुरू असल्यामुळे अनेक नागरिकांना कामावरून परतताना उशीर होतो. रात्री आठ वाजल्यानंतर संचारबंदी असल्याकारणामुळे त्यांना आपापल्या घरी जाताना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. याची जाणीव ठेवूनच संचारबंदी लागू झाल्यानंतर कामावरून परत जाणाऱ्या गरजवंत नागरिकांना घरी जाण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्यावतीने विनामूल्य रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साजऱ्या करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत या उपक्रमाची नोंद होत असल्याकारणाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लॉकडाऊनमध्ये दररोज ७० गरजवंत कामगारांना घरी सोडण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे कटिबद्ध असेल. ही सेवा नागरिकांसाठी सुरु झाली असून गरजवंतांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी रिक्षांना याबाबत स्टिकर लावण्यात आले असून त्याठिकाणी याबाबत बॅनर देखील ठेवण्यात आला आहे. सदर उपक्रमाची सुरवात नवीन पनवेल रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली असून यावेळी नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment