खारघर (प्रतिनिधी ) ; कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकाने नवीन निर्बंध लागू केले असुन त्यात सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले. या पार्श्वभूमीवर खारघर मधील संतसेना महाराज नाभिक वेलफेअर असोसिएशनने मुख्यमंत्री ,पालकमंत्री, जिल्हा अधिकारी,आमदार,खारघर पोलीस आणि पालिका प्रशासनाला निवेदन देत सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशांचे पालन करत आम्ही आमचे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले. शासनाने दिलेल्या अटी-शर्थीचे वेळोवेळी पालन केले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या आम्हा व्यावसायिकांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय द्यावा. कोरोना नियमावलीचे पालन करून आम्ही व्यवसाय करू, अशी भूमिका खारघर मधील संतसेना महाराज नाभिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष पप्पू खामकर, उपाध्यक्ष आबा सोनवणे,राहुल शिंदे,सचिव दिनेश खिर्डेकर,समीर वाघमारे,अमोल जाधव,विजय जाधव,ज्ञानेश्वर सोनवणे,पद्माकर शिरसाट इतर नाभिक सदस्यांच्या वतीने निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हा अधिकारी निधी चौधरी, आमदार प्रशांत ठाकूर,पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसेवक प्रवीण पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी आदींना पत्र पाठवून मागणी केली आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment