Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने शासनाचे काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित

कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर  निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल खालीलप्रमाणे असतील व २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी          ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहील.      सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील.       वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे नाईट कर्फ्युदरम्यान गरजवंताना घरी सोडण्याची सेवा सुरु

पनवेल / प्रतिनिधी : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्यावतीने ७० समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचा संकल्प रचण्यात आला आहे. कोरोना विषाणू संक्रमणाची दुसरी लाट तेजीमध्ये असल्याकारणामुळे राज्य सरकारच्यावतीने एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान कार्यालये व सार्वजनिक वाहतूक सुरू असल्यामुळे अनेक नागरिकांना कामावरून परतताना उशीर होतो. रात्री आठ वाजल्यानंतर संचारबंदी असल्याकारणामुळे त्यांना आपापल्या घरी जाताना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. याची जाणीव ठेवूनच संचारबंदी लागू झाल्यानंतर कामावरून परत जाणाऱ्या गरजवंत नागरिकांना घरी जाण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्यावतीने विनामूल्य रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साजऱ्या करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत या उपक्रमाची नोंद होत असल्याकारणाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लॉकडाऊनमध्ये दररोज ७० गरजवंत कामगारांना घरी सोडण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे कटिब

सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन एस एस स्वयंसेवकाचा मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्याचा स्तुतीपर उपक्रम!

खारघर : सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.अश्यातच अनेकांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन एस एस स्वयंसेवकानी पार पाडला. सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय खारघर च्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कु.निखिल सावंत यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा देशमुख आणि रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-१९ विरुद्ध च्या लढ्यात सहभागी असलेल्या नागरिकांना मास्क आणि सॅनीटायझर चे वाटप केले.परळ आणि टाटा रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरातील बेघर लोक,सफाई कामगार, इमारतींचे पहारेकरी यांना मास्क आणि सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.या वाटप शिबिरामध्ये ५०० मास्क,१०० सॅनीटायझर च्या बाटल्या आणि १ थर्मल स्क्रिनिंग गन यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.हे शिबिर कोविड-१९ च्या सरकारी सुरक्षा नियमावलीचे पालान करून पूर्ण केले.अश्या निर्णायक परिस्थिती मध्ये देखील सुनियोजित आणि सुरक्षितपणे असा उपक्रम पार पाडणे हे खरंच कौतुकास्पद आहे.        

  सलून व्यवसाय सुरू करण्याची मागणी :संतसेना महाराज नाभिक वेलफेअर असोसिएशनने 

खारघर (प्रतिनिधी ) ; कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकाने नवीन निर्बंध लागू केले असुन त्यात सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले. या पार्श्वभूमीवर खारघर मधील संतसेना महाराज नाभिक वेलफेअर असोसिएशनने मुख्यमंत्री ,पालकमंत्री, जिल्हा अधिकारी,आमदार,खारघर पोलीस आणि  पालिका प्रशासनाला निवेदन देत सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशांचे पालन करत आम्ही आमचे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले. शासनाने दिलेल्या अटी-शर्थीचे वेळोवेळी पालन केले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या आम्हा व्यावसायिकांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय द्यावा. कोरोना नियमावलीचे पालन करून आम्ही व्यवसाय करू, अशी भूमिका खारघर मधील संतसेना महाराज नाभिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष पप्पू खामकर, उपाध्यक्ष आबा सोनवणे,राहुल शिंदे,सचिव दिनेश खिर्डेकर,समीर वाघमारे,अमोल जाधव,विजय जाधव,ज्ञानेश्वर सोनवणे,पद्माकर शिरसाट इतर नाभिक सदस्यांच्या वतीने निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हा अधि