लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘डिजिटल वर्ल्ड : इमर्जिंग चॅलेंजेस’ या विषयावर वेबिनारचे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाची संघटना आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल वर्ल्ड : इमर्जिंग चॅलेंजेस’ या विषयावर वेबिनारचे आयोजन 27 मार्च रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात राज्य शासनाच्या वित्त विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी डॉ. राजागोपाल देवरा हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. हा शैक्षणिक उपक्रम प्रा. सुमेध लोखंडे, प्रा. नम्रता गजरा, प्रा. रीत ठुले, प्रा. प्रवर शर्मा आणि आयक्यूएसी टीम यांनी आयोजित केला असून, महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थीवर्गाने यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य शरदकुमार शाह यांनी केले आहे.
‘सीकेटी’ची शुभेच्छा कार्ड स्पर्धा
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शुभेच्छा कार्ड बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील 95 शाळांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावी अशा दोन गटांत स्पर्धा होणार आहे. शुभेच्छा कार्ड 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. प्रत्येक गटाकरिता तीन क्रमांक काढले जातील. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक दोन हजार रुपये, द्वितीय क्रमांक 1500 रुपये आणि तृतीय क्रमांक 1000 रुपये असे आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या शाळांनी शुभेच्छा कार्ड ऑनलाइन पद्धतीने http://forms.gle/585JbyQpptQxi1kf9 या लिंकवर पाठवावीत. अधिक माहितीसाठी पल्लवी दिवेकर (9730949288), राजेश गांगरे 9594825475), अपर्णा मुकणे (976880032) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य इंदू घरत यांनी केले आहे.
Comments
Post a Comment