पनवेल : पनवेल येथील रेखा केतन गंगर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहीण आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या अवयव दानामुळे अनेकांना जीवनदान मिळणार आहे
‘मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत म्हण आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. मरणोत्तर मानवी अवयवाची एक तर राख होते किंवा माती! मरणोत्तर नेत्रदान, त्वचादान, किंवा अवयवदान केल्यामुळे जर अन्य कोणा गरजूला जीवनाची अनुभूती घेता येऊ शकेल तर त्यापेक्षा कोणते श्रेष्ठ दान असूच शकत नाही. अवयवदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही जिवंत राहता येते. हे काम पुण्य कमावण्याचे आहे. अवयवदानाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. पनवेल, जुना ठाणा नाका येथील रेखा गंगर यांचे 40 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या अंत्यसंस्काराला विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, डॉक्टर सुरेखा मोहोकर आणि शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते. रेखा गंगर या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. त्यांच्या निधनामुळे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment