पनवेल(प्रतिनिधी) कसळखंड गावाचे मुळ गावठाण आणि विस्तारित गावठाण यांचे खाजगी सर्वेक्षण करून लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने आवश्यक सोयी सुविधा संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून त्यासाठी कसलखंड गावठाण विस्तार समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
या संदर्भात आज (दि. २७) शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून राजाराम पाटील, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, प्रगतिशील शेतकरी कमलाकर घरत, निवृत्त पोलीस अधिकारी पंढरीनाथ गाढे, माजी उपसरपंच रोहित घरत, रमेश पाटील, भगवान घरत, सुरेश नाईक, शांताराम पाटील, अनंता घरत, यशवंत घरत, दिलीप पाटील, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तानाजी पाटील, ज्येष्ठ व युवक उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर आजतगायत कसळखंड गावाचा नैसर्गिक लोकसंख्या वाढीमुळे दर दहा वर्षांनी होणारा २०० मिटर गावठाण विस्ताराचा ठराव झाला नाही. शासनानेही गावाच्या विस्तारासाठी कोणातच विचार केला नव्हता. भविष्यात सिडको, नैना, एमएसआरडीसी, एमएमआरडीए या संस्था अनेक गावातील बांधकाम अनधिकृत ठरवित आहेत. त्यामुळे वेळेवरच याकडे लक्ष न दिल्यास त्याचा गावांना मोठा तोटा होणार आहे. हे लक्षात घेत ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकत स्वखर्चाने सर्वेक्षण करून गावठाण विस्ताराचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्याला पाठींबा देऊन मार्गदर्शन करावे, असे आवाहन समितीने केले आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment