लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढददिवसानिमित्त राजे प्रतिष्ठानतर्फे गरजुंना करण्यात येणार ७०० पुराणपोळ्यांचे वाटप
पनवेल / प्रतिनिधी : होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना सुचली न त्यानुसार गेल्या ३ वर्षांपासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे यावर्षीही पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर - गरिबांना व गरजूंना लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७०० पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवूनच आराजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार असून ज्यांना कोणाला पुरणपोळी दान करण्याची इच्छा असेल त्यांनी ९९८७७३३९८७, ९२२०४०३५०९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment