पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्याल्याचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पदवी आणि पदव्युत्तर विभागातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या समारंभात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, विद्यार्थ्यांना समाजसन्मुख जीवन जगण्याचा संदेश दिला. आपल्या यशाची कीर्ती सर्वदूर पसरो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या संघर्षाच्या काळातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. सकारात्मक दृष्टीकोन हाच यशाचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादनही त्यांनी याप्रसंगी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी या समारंभाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावाही घेतला. तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, ग्रंथ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पदवीधारकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. या समारंभाला कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पाटील, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. नरेश मढवी आणि विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. जी. जे. कोरणे उपस्थित होते. अतिशय नियमबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेनिकर, प्रा. सोनू तवर आणि प्रा. प्रवीण गायकर यांनी केले.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment