पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः खनिज, सीडस् आणि ऑईल खरेदी-विक्री करुन फसवणुक केल्याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी अटक केलेल्या निविग्वे इमिनके कोलिन्स उर्फ जन (34) या नायजेरियन नागरिकाने बनावट व्हिजा तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील नायजेरियन नागरिक निविग्वे इमिनके कोलिन्स उर्फ जन (34) याला एनआरआय पोलिसांनी ऑनलाईन खनिज, सीडस् आणि ऑईल खरेदी-विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी निविग्वे याच्या ताब्यातून पासपोर्ट आणि व्हिजाची छायांकित प्रत जप्त केली होती. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी निविग्वे याचा पासपोर्ट आणि व्हिजाच्या पडताळणीसाठी विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविले होते. त्यानुसार विशेष शाखेने निविग्वे याच्या पासपोर्ट आणि व्हिजाची पडताळणी केली असता, त्याच्याकडे आढळून आलेल्या व्हिजाची छायांकित प्रत बनावट असल्याचे आणि सदरचा व्हिजा दुसर्याच व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. निविग्वे या नायजेरियन नागरिकाने दुसर्याच्या नावाने असलेल्या व्हिजाची प्रत मिळवून, त्याद्वारे आपल्या नावाने व्हिजा तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आल्याने तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment