महाशिवरात्री व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ७० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप
पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ७० सामाजिक उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र सरचिटणीस केवल महाडीक यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले आहेत. गुरुवार दिनांक ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्रि निमित्ताने पनवेल येथील विरुपाक्ष मंदिर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना ७० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप संध्याकाळी ५ ते ८ यावेळेत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे करण्यात येणार आहे तरी या ठिकाणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केवल महाडिक यांनी केले आहे.
Comments
Post a Comment