सरस्वती इंजिनिअरिंग काॅलेजच्या एन्एस्एस् युनिटचा अनोखा उपक्रम
खारघर : सामाजिक कर्तव्य पार पाडण्यात अग्रेसर असणा-या सरस्वती काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन्एस्एस्) युनिटने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सशक्तीकरणाचे धडे दिले. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सदर उपक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.मंजुषा देशमुख आणि एन्एस्एस् कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.सुनिता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालकांनी महिलांचे समाजामधील योगदान ह्या विषयावर केली. तर एका स्वयंसेवकाने आपल्या भाषणामधून इतिहासातील तसेच आधुनिक युगातील स्त्रियांच्या सामर्थ्य आणि धैर्याचे दाखले दिले. तसेच महिला सशक्तीकरण ह्या विषयावर भाष्य करताना महिलांनी स्व: सुरक्षा म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ह्याचेही धडे देण्यात आले.
महाविद्यालयातील संगणक शाखेतील द्वितीय वर्षात शिकत असणारी विद्यार्थीनी कु.अपूर्वा भिलारे हिने प्रथम वर्षात शिकत असणा-या कु. अथर्व भिलारे ह्या साथीदाराच्या मदतीने उपस्थित महिला वर्गाला स्व:सुरक्षेचे प्रशिक्षण दिले. सुमारे १० वर्षांपासून कराटेपटू असणा-या ह्या दोघांनी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर अनेक पदके पटकावली आहेत.
वाईट प्रसंग उद्भवल्यास स्वतःची सुटका कशी करायची ह्याच्या काही बचावात्मक क्लृपत्या त्यांनी सांगितल्या. कार्यक्रमाची सांगता करण्याआधी स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील महिला शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी ह्यांना स्वहस्तनिर्मित कागदी शुभेच्छा पत्र व फुले वाटप केली. कोव्हिड-१९ च्या धर्तीवर सरकारने आखून दिलेल्या सर्व नियम आणि निर्देशांचे पालन करत सदर उपक्रम पार पडला. प्राचार्या डाॅ. देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्त्रियांना समाजात मिळणारे दुय्यम स्थान व त्याचे दुष्परिणाम ह्या गंभीर विषयावर भाष्य केले व आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment