Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त गायन स्पर्धा

पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे कॅपेला-संगीत साधनांव्यतिरिक्त या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाइन असून, ०३ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. स्पर्धा पनवेल तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेसाठी आतापर्यंत ४० कनिष्ठ महाविद्यालयांनी संपर्क साधला आहे. पनवेल तालुक्यातील जास्तीत जास्त कनिष्ठ महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत आहे. त्यासाठी शारदा पगारे (९५६११४१७०९) किंवा विकास गाढवे (९३२६४७७४७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्य दुर्गादेवी मोर्या आणि शिक्षकवृंदाने केले आहे

गावठाण विस्तारासाठी कसळखंड ग्रामस्थांचा पुढाकार

पनवेल(प्रतिनिधी) कसळखंड गावाचे मुळ गावठाण आणि विस्तारित गावठाण यांचे खाजगी सर्वेक्षण करून लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने आवश्यक सोयी सुविधा संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून त्यासाठी कसलखंड गावठाण विस्तार समितीची स्थापना करण्यात येणार आहे.          या संदर्भात आज (दि. २७) शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून राजाराम पाटील, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, प्रगतिशील शेतकरी कमलाकर घरत, निवृत्त पोलीस अधिकारी पंढरीनाथ गाढे, माजी उपसरपंच रोहित घरत, रमेश पाटील, भगवान घरत, सुरेश नाईक, शांताराम पाटील, अनंता घरत, यशवंत घरत, दिलीप पाटील, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तानाजी पाटील, ज्येष्ठ व युवक उपस्थित होते.         स्वातंत्र्यानंतर आजतगायत कसळखंड गावाचा नैसर्गिक लोकसंख्या वाढीमुळे दर दहा वर्षांनी होणारा २०० मिटर गावठाण विस्ताराचा ठराव झाला नाही. शासनानेही गावाच्या विस्तारासाठी कोणातच विचार केला नव्हता. भविष्यात सिडको, नैना, एमएसआरडीसी, एमएमआरडीए या संस्था अनेक गावातील बांधकाम अनधिकृत ठरवित आहेत. त्याम

लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढददिवसानिमित्त राजे प्रतिष्ठानतर्फे गरजुंना करण्यात येणार ७०० पुराणपोळ्यांचे वाटप

पनवेल / प्रतिनिधी : होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना सुचली न त्यानुसार गेल्या ३ वर्षांपासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे यावर्षीही पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर - गरिबांना व गरजूंना लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७०० पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवूनच आराजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येण

शॉपींग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्ससाठी कोविडचे नवे नियम

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः  पनवेल महापालिका क्षेत्रात  कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी  महापालिका आयुक्तांनी या क्षेत्रातील कोरोना नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः शॉपींग मॉल आणि डिपार्टमेंट स्टोअर्सनी नव्या नियमानुसार काम केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच ते पूर्ण बंद करण्याचा इशाराही, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नव्या आदेशाद्वारे दिला आहे. शॉपींग मॉल्स आणि डी मार्ट, स्टार बाजार, रिलायन्स फ्रेश यांसारख्या डिपार्टमेंट स्टोअरसाठी त्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. शॉपींग मॉल्स आणि डिपार्टमेंट स्टोअरमध्ये मास्कशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान तपासूनच प्रवेश दिला जावा, ताप किंवा तापसदृश्य लक्षणे आढळल्यास प्रवेश देऊ नये, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरेसे मनुष्यबळ व्यवस्थापनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच डिपार्टमेंट स्टोअरर्समध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात यावा. याबरोबरच शॉपींग मॉलमध्ये दर शुक्रवारी सायंकाळी 4.00 नंतर  शनिवार आणि रविवारी येणार्या प्रत्येकाची अँटी

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष  उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘डिजिटल वर्ल्ड : इमर्जिंग चॅलेंजेस’ या विषयावर वेबिनारचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाची संघटना आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल वर्ल्ड : इमर्जिंग चॅलेंजेस’ या विषयावर वेबिनारचे आयोजन 27 मार्च रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य शासनाच्या वित्त विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी डॉ. राजागोपाल देवरा हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. हा शैक्षणिक उपक्रम प्रा. सुमेध लोखंडे, प्रा. नम्रता गजरा, प्रा. रीत ठुले, प्रा. प्रवर शर्मा आणि आयक्यूएसी टीम यांनी आयोजित केला असून, महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थीवर्गाने यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य शरदकुमार शाह यांनी केले आहे. ‘सीकेटी’ची शुभेच्छा कार्ड स्पर्धा पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पनवेल परिसरा

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेलच्या नृत्यआराधना कला निकेतन संस्थेची बाजी-

शिष्यांनी पटकाविली अनेक पारितोषिके- गुरु दिपीका सराफ यांना बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कार   पनवेल(प्रतिनिधी) अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर ऑफ थे इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सीआयडी पॅरिस-फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'वर्ल्ड डान्सर ऑनलाईन इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट २०२१' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींनी तसेच त्यांच्या प्रशिक्षकांनी नेत्रदिपक कामगिरी करून सुवर्णयश संपादन केले आहे. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले. यावेळी मनिष सराफ, सचिन सराफ, प्रशिक्षक गुरु दिपीका सराफ, अमिता सराफ आदी उपस्थित होते.   ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, कॅनडा, जर्मनी, ओमान, युएई, सिंगापूर, मलेशिया, कतार, एकोडोर आदी देशातील  ४६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील ३०६ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनी अट्टम, सेमी क्लासिकल, इंडियन फो

बनावट व्हिजा; नायजेरियन नागरिकावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः खनिज, सीडस् आणि ऑईल खरेदी-विक्री करुन फसवणुक केल्याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी अटक केलेल्या निविग्वे इमिनके कोलिन्स उर्फ जन (34) या नायजेरियन नागरिकाने बनावट व्हिजा तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील नायजेरियन नागरिक निविग्वे इमिनके कोलिन्स उर्फ जन (34) याला एनआरआय पोलिसांनी ऑनलाईन खनिज, सीडस् आणि ऑईल खरेदी-विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी निविग्वे याच्या ताब्यातून पासपोर्ट आणि व्हिजाची छायांकित प्रत जप्त केली होती. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी निविग्वे याचा पासपोर्ट आणि व्हिजाच्या पडताळणीसाठी विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविले होते. त्यानुसार विशेष शाखेने निविग्वे याच्या पासपोर्ट आणि व्हिजाची पडताळणी केली असता, त्याच्याकडे आढळून आलेल्या व्हिजाची छायांकित प्रत बनावट असल्याचे आणि सदरचा व्हिजा दुसर्‍याच व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. निविग्वे या नायजेरियन नागरिकाने दुसर्‍याच्या नावाने असल

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्याल्याचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.      शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पदवी आणि पदव्युत्तर विभागातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या समारंभात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.    आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, विद्यार्थ्यांना समाजसन्मुख जीवन जगण्याचा संदेश दिला. आपल्या यशाची कीर्ती सर्वदूर पसरो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या संघर्षाच्या काळातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. सकारात्मक दृष्टीकोन हाच यशाचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादनही त्यांनी याप्रसंगी केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर  यांनी या समारंभाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावाही घेत

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्तेआपला आधार फाउंडेशनच्या व्यावसायिक कार्यालयाचे थाटामाटात उदघाटन

पनवेल / प्रतिनिधी : पनवेलमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आपला आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब तसेच कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. आपला आधार फाउंडेशनमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तसेच सी.एम.जी.पी , तसेच पी, एम, जी, पी, स्टार्टअप इंडिया, कौशल्य भारत, खादी इंडिया या सरकारी निम सरकारी योजनेतून आपला स्वतंत्र व्यवसाय स्थापन करण्याकरिता तसेच बेरोजगारांना उदमी होण्याकरिता कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून खास तरुण - तरुणी आणि महिलांसाठी रोजगाराची संधी मुंबई , महाराष्ट्र इतर राज्य करिता देखील उपलब्ध आहे. तसेच याव्यतिरिक्त रिअल इस्टेट, होम लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन व इतर लोन देखील उपलब्ध करून देण्याचे काम देखील याठिकाणी केले जाणार आहे. या उदघाटन सोहळ्यास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, सचिन लोखंडे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, खां

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शैक्षणिक यशाबद्दल अमन शेखचे अभिनंदन; पुढील शिक्षणासाठीही करणार आर्थिक मदत

पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत व अग्रेसर असणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने अमन अल्लाउदीन शेख याला एरोस्पेस इंजिनीअरिंग शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यानुसार अमन शेख हा एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अमनचे रविवारी (दि. 14) अभिनंदन केले आणि इंग्लंडमधील कार्डिफ युनिव्हर्सिटी येथील पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. अमनसोबत अल्लाउदीन शेख, रजिया शेख उपस्थित होते. या वेळी बोलताना दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अमनच्या इंग्लंड येथील शिक्षणासाठीदेखील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मदत करण्यात येईल, असे जाहीर केले. याबद्दल अमन शेख याच्या पालकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

वैभव गायकर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान- अलिबागमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

अलिबाग (प्रतिनिधी)-  सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळण्याच्या भूमिकेतून पनवेलमध्ये अनेक वर्षे पत्रकारिता करणारे पत्रकार वैभव गायकर यांना रायगड प्रेस क्लबकडून दिला जाणारा रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पर्यटनविकास मंत्री रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपुर्वक देण्यात आला. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, रायगड जिल्हा प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आदी उपस्थित होते. बारा वर्षांपुर्वी रामप्रहर वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरूवात करून वैभव गायकर यांनी पुढारी वृत्तपत्रात देखील खारघर वार्तांहर म्हणून काम केले. मागील अनेक वर्षांपासून ते लोकमत या नामांकित वृत्तपत्रात पनवेल तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. पनवेल महापालिका, सिडको आदीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न गायकर यांनी केला आहे. तटस्थपणे पत्रकारिता करीत अनेक प्रश्न त्यांनी पत्रकारितेतून मांडले. वेळ

रेखा केतन गंगर यांचे अवयवदान

पनवेल : पनवेल येथील रेखा केतन गंगर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहीण आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या अवयव दानामुळे अनेकांना जीवनदान मिळणार आहे          ‘मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत म्हण आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. मरणोत्तर मानवी अवयवाची एक तर राख होते किंवा माती! मरणोत्तर नेत्रदान, त्वचादान, किंवा अवयवदान केल्यामुळे जर अन्य कोणा गरजूला जीवनाची अनुभूती घेता येऊ शकेल तर त्यापेक्षा कोणते श्रेष्ठ दान असूच शकत नाही. अवयवदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही जिवंत राहता येते. हे काम पुण्य कमावण्याचे आहे. अवयवदानाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. पनवेल, जुना ठाणा नाका येथील रेखा गंगर यांचे 40 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या अंत्यसंस्काराला विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, डॉक्टर सुरेखा मोहोकर आणि शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते. रेखा गंगर या सामाजिक कार्यात अग्

वेदिकाच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून ५० हजारांची आर्थिक मदत

पनवेल(प्रतिनिधी) 'एसएमए टाईप १' या गंभीर आजाराशी झुंज घेत असलेल्या वेदिका सौरभ शिंदे या बालिकेच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली. सदरचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते वेदिकाच्या पालकांकडे आज (दि. १३) सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते राजेश भालेकर उपस्थित होते.  वेदिका पुणे जिल्हयातील भोसरी येथील असून तिचे वय अवघे ८ महिने आहे. या लहान वयातच तिला 'एसएमए टाईप १' या गंभीर आजराने ग्रासले आहे. १० हजार मध्ये एक बालकावर या आजाराचा परिणाम होतो. या आजारामुळे मेरुदंडातील स्नायूंच्या एंट्रॉफी सर्वात तीव्र आणि जलद स्वरूपाने वाढतात. या आजारात बाळाच्या नसा व स्नायूंवर आक्रमण होते. त्यामुळे श्वासापासून बाकी क्रिया खूप कठिण जातात. वेदिकावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गंभीर आजाराचा उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वेदि

संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनी नियमांचे काटेकोर पालन करावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि १३: गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज ते आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.  यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशी, डॉ तात्याराव लहाने, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेल्या ४ महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल

लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ७० गरीब लहान मुलांना दूधकोल्ड्रिंक व मस्तानी आईस्क्रीमचे करण्यात आले वाटप

पनवेल / प्रतिनिधी : पनवेलकरांचा अभिमान लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक कार्यक्रमांतर्गत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कैलास भोईर ( भोईर बंधू ) यांच्या माध्यमातून गरीब मुलांना मोफत ७० दुधकोल्ड्रिंक व मस्तानी आईस्क्रीमचे वाटप व्ही.के. हायस्कुल सर्व्हिस रोड, विजय सेल्स समोर दिनांक १३ मार्च २०२१ रोजी रात्रौ ९ वाजता करण्यात आले. ज्या गरीब लहान मुलांना एकवेळचे जेवण मिळणे देखील कठीण असते अशा लहान मुलांना दुधकोल्ड्रिंक व मस्तानी आईस्क्रीम खाण्यास मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची चर्चा सध्या पनवेल शहरात सुरू असून ७० कार्यक्रम करण्याचा संकल्प करणारे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांचे विशेष कौतुक होत आहे. या कार्यक्रमास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवलदादा महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, खांदा कॉलनी उपाध्यक्ष सदाशिव मोरे, गंगाराम शिंदे, ओमकार मह

महाशिवरात्री व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ७० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप

पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या  वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ७० सामाजिक उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र सरचिटणीस केवल महाडीक यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले आहेत. गुरुवार दिनांक ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्रि निमित्ताने पनवेल येथील विरुपाक्ष मंदिर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना ७० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप संध्याकाळी ५ ते ८ यावेळेत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे करण्यात येणार आहे तरी या ठिकाणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केवल महाडिक यांनी केले आहे.

सरस्वती इंजिनिअरिंग काॅलेजच्या एन्एस्एस् युनिटने महिला सशक्तीकरणाचे दिले धडे!

सरस्वती इंजिनिअरिंग काॅलेजच्या एन्एस्एस् युनिटचा अनोखा उपक्रम खारघर : सामाजिक कर्तव्य पार पाडण्यात अग्रेसर असणा-या सरस्वती काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन्एस्एस्) युनिटने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सशक्तीकरणाचे धडे दिले. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सदर उपक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.मंजुषा देशमुख आणि एन्एस्एस् कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.सुनिता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालकांनी महिलांचे समाजामधील योगदान ह्या विषयावर केली. तर एका स्वयंसेवकाने आपल्या भाषणामधून इतिहासातील तसेच आधुनिक युगातील स्त्रियांच्या सामर्थ्य आणि धैर्याचे दाखले दिले. तसेच महिला सशक्तीकरण ह्या विषयावर भाष्य करताना महिलांनी स्व: सुरक्षा म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ह्याचेही धडे देण्यात आले. महाविद्यालयातील संगणक शाखेतील द्वितीय वर्षात शिकत असणारी विद्यार्थीनी कु.अपूर्वा भिलारे हिने प्रथम वर्षात शिकत असणा-या कु. अथर्व भिला

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त व महिला दिनानिमित्त ७० लहान गरीब मुलींना करण्यात आले अन्नदान

पनवेल /प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त दिनांक ९ मार्च २०२१ रोजी आसूडगाव परिसरातील ७० गरीब लहान मुलींना अन्नदान करण्यात आले. महिला दिनानिमित्त विविध ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम राबविले जातात मात्र फक्त एक दिवस महिलांचा सन्मान न होता नेहमीच त्यांचा सन्मान व्हावा असा उद्देश राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा राहिला आहे तसेच गोर - गरीब महिला व लहान मुली या कोरोना काळापासून आर्थिक विवंचनेत असून अनेकदा त्यांना उपासमार सहन करावी लागते याची जाणीव ठेवूनच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने व अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मार्गदर्शनाने महिला दिन व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आज आसूडगाव येथे ७० गरीब लहान मुलींना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे अन्नदान करण्यात आले या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमावेळी महाराष्ट्र सहचिटणीस केव