Skip to main content

खारघर मध्ये गोळीबार करणारे अटकेत

 

पनवेल दि.25(वार्ताहर) पेण येथून नवी मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर शनिवारी रात्री खारघर येथे गोळीबार करुन फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. विपीन शैलेंद्र ठाकुर (19), गोपाल ननु सिंह (23), अभिनंदनकुमार गणेश शर्मा (23) आणि मुचन नागेंद्र ठाकुर (19) अशी या आरोपींची नावे असून त्यांनी लुटमारीच्या उद्देशाने प्रतीक आहेर याच्यावर गोळीबार ssकेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे लुटमारी करुन मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरु करण्याची या तरुणांची योजना असल्याचे तपासात आढळुन आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जफ्त केले आहे.  

या आरोपींच्या गोळीबारात जखमी झालेला प्रतीक आहेर हा तरुण पेण शहरात राहण्यास असून तो शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पेण येथून मेस्ट्रो या मोटारसायकलवरून नवी मुंबईत फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथून सायन पनवेल हमार्गे घरी जात असताना, रियान शाळे समोरील रस्त्यावर सिगरेट ओढण्यासाठी गेला होता. याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या तिघा आरोपींनी प्रतिककडे मोबाईल, पैसे व त्याच्या मोटरसायकलच्या चावीची मागणी केली. मात्र प्रतिकने त्यांना नकार दिल्याने एकाने प्रतीक जवळचा मोबाईल  फोन जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रतीकने त्यांना विरोध केल्यानंतर त्यातील एका आरोपीने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर आपल्याकडील रिवॉल्वरने एक गोळी झाडली होती.  

या गोळीबारात प्रतिक जखमी झाल्यानंतर तिघा आरोपींनी त्या ठिकाणावरुन पलायन केले होते. या घटनेची माहिती मिळ्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रतीक आहेर याला प्रथम खारघर मधील सिटी हॉस्पिटल व त्यानंतर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱया आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिसांनी खारघर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र त्यांना त्यातून काहिच माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांनी कोपरा गावातील एकमेव कॅमेरा तपासला असता, त्यात गोळीबार झाल्याच्या वेळेत 4 तरुण निदर्शनास आले. सदर तरुणांबाबत पोलिसांनी अधीक माहिती घेतली असता, एक दिवसापुर्वीच तेथील चाळीमध्ये 4 तरुण राहाण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  

त्यानुसार पोलिसांनी त्या भागात सापळा लावून त्याठिकाणी आलेल्या दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दोन्ही तरुणांकडे अधीक चौकशी केली असता, त्यांनी प्रतीकला लुटण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्या इतर दोघा साथिदारांना देखील अटक केली. तसेच त्यांनी ज्या रिव्हॉल्वर मधुन गोळीबार केला, ते रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस देखील जफ्त केले. या आरोपींनी गोळीबार करुन लुटमारी करुन मिळालेल्या रक्कमेतून हॉटेल सुरु करण्याची योजना आखल्याचे त्यांच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. सदरची कामगीरी महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पढार, मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार,गुहाने आदींच्या पथकाने केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.