महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात नॉन कोव्हिड रुग्णांनाही आरोग्य सेवा द्या - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात कोव्हिड व नॉन कोव्हिड रुग्णांनाही आरोग्य सेवा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे .
पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात तत्कालीन परिस्थिती पहाता कोव्हिड रुग्णावर उपचार करणे गरजेचे होते . त्यामुळे रायगड जिल्हाधिकार्यांनी एप्रिल 2020 मध्ये हे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय घोषित केले होते . ते अद्याप पर्यंत कोव्हिड रुग्णालायच असल्याने या रुग्णालयात इतर रुग्णावर उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे गरजू व गरीब इतर रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे पत्र देऊन येथे इतर रुग्णांवर उपचार करण्यास व त्यांना आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश देण्याची मागणी केली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधीकार्यांना दिलेल्या पत्रात सद्यस्थितीत कोव्हिड रुग्णांची संख्या कमी होत असून अशा परिस्थितीत गरजू व गरीब इतर रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यास येणार्या अडचणी दूर होण्यासाठी कोव्हिड रुग्णांबरोबरच नॉन कोव्हिड रुग्णांनाही वैद्यकीय उपचार व सेवा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. उप -संचालक आरोग्य सेवा , ठाणे यांनी 6 जानेवारी 2021 रोजी या रुग्णालयाला भेट दिली असता येथे कोव्हिड रुग्णांबरोबरच नॉन कोव्हिड सेवा सुरू करणे बाबत उपजिल्हा रुग्णालयाच्या संबंधित अधिकार्यांना सूचित केले होते. त्यामुळे आपण याचा विचार करून आपल्या स्तरावर उचित निर्णिय घेऊन तसे आदेश द्यावे अशी मागणी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे
Comments
Post a Comment