भाजपा खारघर-तलोजा मंडल महिला मोर्चाच्या वतीने सा. न्या. मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी
खारघर(प्रतिनिधी)- भाजपा खारघर-तलोजा मंडल महिला मोर्चा आघाडीच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध तसेच त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन पनवेल तहसील कार्यालयात देण्यात आले.मोर्चामधील उपस्थित महिलांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्या प्रसंगी उत्तर रायगड महिला अघाड़ी उपाध्यक्ष सौ संध्या शारबिंद्रे, खारघर महिला आघाडी अध्यक्षा सौ वनीता पाटिल,पनवेल महानगरपालिका प्रभाग समिति अध्यक्षा सौ. अनिता पाटील, उत्तर रायगड जिल्ला चिटणीस सौ. गीता चौधरी, खारघर महिला अघाड़ी सरचिटणीस सौ. साधना पवार, नगरसेविका आरती नवघरे, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, खारघर मंडल उपाध्यक्षा बिना गोगरी, महिला अघाड़ी अध्यक्ष प्रतीक्षा कदम, सदस्य स्मिता आचार्य, श्यामला शेट्टीघर, सीमा खडसे, शोभा मिश्रा तसेच खारघर भाजपा महिला मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment