Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

खारघर मध्ये गोळीबार करणारे अटकेत

  पनवेल दि.25(वार्ताहर) पेण येथून नवी मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर शनिवारी रात्री खारघर येथे गोळीबार करुन फरार झालेल्या चारही आरोपींना अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. विपीन शैलेंद्र ठाकुर (19), गोपाल ननु सिंह (23), अभिनंदनकुमार गणेश शर्मा (23) आणि मुचन नागेंद्र ठाकुर (19) अशी या आरोपींची नावे असून त्यांनी लुटमारीच्या उद्देशाने प्रतीक आहेर याच्यावर गोळीबार ssकेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे लुटमारी करुन मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरु करण्याची या तरुणांची योजना असल्याचे तपासात आढळुन आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जफ्त केले आहे.   या आरोपींच्या गोळीबारात जखमी झालेला प्रतीक आहेर हा तरुण पेण शहरात राहण्यास असून तो शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पेण येथून मेस्ट्रो या मोटारसायकलवरून नवी मुंबईत फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथून सायन पनवेल हमार्गे घरी जात असताना, रियान शाळे समोरील रस्त्यावर सिगरेट ओढण्यासाठी गेला होता. याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या तिघा आरोपींनी प्रत

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात नॉन कोव्हिड रुग्णांनाही आरोग्य सेवा द्या - आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी)  पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात कोव्हिड व नॉन कोव्हिड  रुग्णांनाही आरोग्य सेवा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी  रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे .      पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उप जिल्हा रुग्णालयात  तत्कालीन  परिस्थिती पहाता कोव्हिड रुग्णावर उपचार  करणे गरजेचे होते . त्यामुळे  रायगड जिल्हाधिकार्‍यांनी  एप्रिल 2020 मध्ये हे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय घोषित  केले होते . ते अद्याप पर्यंत कोव्हिड रुग्णालायच असल्याने  या रुग्णालयात इतर रुग्णावर उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे गरजू व गरीब इतर रुग्णांना  अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे पत्र देऊन येथे इतर रुग्णांवर उपचार  करण्यास  व त्यांना आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश देण्याची मागणी केली आहे.      आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधीकार्‍यांना दिलेल्या पत्रात सद्यस्थितीत कोव्हिड रुग्णांची संख्या कमी ह

खारघरमध्ये कृत्रिम फुप्फुस मंडळाची स्थापना

  खारघर दि.१८(प्रतिनिधी)-    हल्लीच्या काळात वायुप्रदूषण हे वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे जे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या गंभीर समस्येची तीव्रता लक्षात घेता ‘वातावरण फाउंडेशन’ यांच्यातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरीता खारघरमध्ये कृत्रिम फुप्फुस मंडळाची स्थापना करण्यात आली. या जनजागृती अभियानामध्ये पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री.प्रशांतदादा ठाकूर, प्रभाग समिती (अ) मा. सभापती श्री. अभिमन्यू धर्मा पाटील, पनवेल महानगरपालिका नगरसेवक श्री.प्रवीण पाटील व इतर पदाधिकारी मान्यवर यांनी भेट दिली. त्यावेळची काही क्षणचित्रे...

प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यालयाचे खारघर येथे उदघाटन

खारघर(प्रतिनिधी)-  अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माण करायला प्रारंभ झाला आहे.सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य श्रीराम मंदिर साकारण्यात येणार आहे.दि १५ जाने रोजी श्रीराम मंदिर निर्माण निधी अभियान खारघर सेक्टर १९ च्या वस्ती कार्यालयाचे उदघाटन जिल्हा निधी अभियान प्रमुख श्री आनंद जोशी, इस्कॉन मंदिराचे संत परमदास गुरुजी,जगदीश मुकुंददास गुरुजी.मा. कोकण म्हाडा अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील,विश्व हिंदू परिषद खारघर नगर अभियान प्रमुख श्री विजय कनवर तसेच सेक्टर १९ हे वस्ती प्रमुख भावेश अंकोली या यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी कार्यालयात वैदिक हवन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी राम श्रीराम जन्मभूमी निर्माण संघर्षाची माहिती दिली व जनसमर्पण निधी संकलन अभियान चालविण्या मागचे उद्देश यावर मार्गदर्शन केले. यावेळी अनेक रामभक्त कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अरविंद थापलु, शिवम सिंग, रंजन शर्मा,भाजपा खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल,नगरसेवक अभिमन्यू पाटील तसेच भाजपाचे कार्य

भाजपा खारघर-तलोजा मंडल महिला मोर्चाच्या वतीने सा. न्या. मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी

   खारघर(प्रतिनिधी)-   भाजपा खारघर-तलोजा मंडल महिला मोर्चा आघाडीच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध तसेच त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन पनवेल तहसील कार्यालयात देण्यात आले.मोर्चामधील उपस्थित महिलांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्या प्रसंगी उत्तर रायगड महिला अघाड़ी उपाध्यक्ष सौ संध्या शारबिंद्रे, खारघर महिला आघाडी अध्यक्षा सौ वनीता पाटिल,पनवेल महानगरपालिका प्रभाग समिति अध्यक्षा सौ. अनिता पाटील, उत्तर रायगड जिल्ला चिटणीस सौ. गीता चौधरी, खारघर महिला अघाड़ी सरचिटणीस सौ. साधना पवार, नगरसेविका आरती नवघरे, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, खारघर मंडल उपाध्यक्षा बिना गोगरी, महिला अघाड़ी अध्यक्ष प्रतीक्षा कदम, सदस्य स्मिता आचार्य, श्यामला शेट्टीघर, सीमा खडसे, शोभा मिश्रा तसेच खारघर भाजपा महिला मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची कार्यकारी मंडळ सभा शनिवारी आयोजित करण्यात आली आहे

पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेलची सन २०२०-२१ ची कार्यकारी मंडळाची चौथी सभा शनिवार दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ०४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.               हि सभा खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात होणार असून मंडळाचे पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

भारत विकास परिषदेद्वारे बालिका सप्ताह उपक्रमाचे आयोजन

  पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः भारत विकास परिषदे द्वारे देशभर बालिका  सप्ताह उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. भारत विकास परिषद संपूर्ण भारतात कार्यरत असलेली एक सामाजिक संस्था आहे. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण  या पंचसूत्री नुसार सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे विविध उपक्रम देखील देशभरात आयोजित केले जातात. याच अनुषंगाने ऍनिमिया-मुक्त भारत’, बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या दोन अभियाना अंतर्गत मुलींच्या शिक्षण आणि आरोग्य या विषयात काम करीत आहोत. राष्ट्रीय ’कन्या दिना’ निमित्त 17 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 रोजी भारत विकास परिषदेतर्फे महिला व बाल विकास आयामा अंतर्गत ’बालिका सप्ताहा चे आयोजन करण्यात येत आहे. या आठवड्यात भारत विकास परिषदेच्या सर्व शाखा, देशभरात सर्वत्र एकाच पद्धतीचे कार्यक्रम घेणार आहेत. बेटी है तो सृष्टि है या संकल्पनेवर   आधारित सर्व कार्यक्रम आहेत. पनवेल शाखेतर्फे या उपक्रमाचे आयोजन देवशेतवाडी (खोपोली जवळ)  खालीलप्रमाणे करणार आहेत. त्यामध्ये दिनांक 17 जानेवारी:- 10 ते 18 वयोगटातील मुलींसाठी हिमोग्लोबिन चाचणी मोहीम राबविली जाईल

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक कोटकतर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

 पनवेल / प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व डॅशिंगपणे कार्य करणारे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना कोटक लाईफ इन्शुरन्सच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वाशी येथील तुंगा हॉटेल येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नवी मुंबईमधील कोरोना काळात जनतेसाठी निःस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा कोटक लाईफ इन्शुरन्सतर्फे कोरोना योद्धा पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळ्यास चीफ मॅनेजिंग पार्टनर अनिता शर्मा, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट गणेश डोळस, विभाग व्यवस्थापक जयदीप गुप्ता, शाखा व्यवस्थापक अभिजित पाटील, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट धवल आचार्य, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष डॅनी डिसोझा, नवी मुंबई महिला सचिव स्नेहा चांदोरकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

लोककला व पथनाट्य पथक शासकीय निवडसूची 2021 साठी कला क्षेत्रातील अनुभवी संस्थांनी दि.19 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने लोककला, पथनाट्याद्वारे करण्याकरिता (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरुपी, भारुड इ.) लोककला, पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. तरी याबाबत कला क्षेत्रातील अनुभवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून अर्जाचा नमुना व माहितीपत्रक प्राप्त करून घ्यावे किंवा www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असलेला अर्जाचा नमुना व माहितीपत्रक उपलब्ध करुन घ्यावे. विहीत नमुन्यातील अर्ज भरुन जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अलिबाग- रायगड येथे दि.19 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे. पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम, पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स

ओवे कॅम्प धरण परिसरात पार्ट्या आणि गर्दुल्यांचा वाढता वावर ; कारवाईची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांची मागणी

  पनवेल, दि.13 (वार्ताहर) :खारघर येथील ओवे कॅम्प धरण गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. असे असले तरी डोंगराच्या लगत असलेल्या या जलाशयाच्या भोवती मोठ्या प्रमाणात दारूच्या पार्ट्या होत आहेत. याठिकाणी मद्यपी धरणा सुद्धा उतरत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना येथे होत नाही. त्यामुळे याप्रश्‍नी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना साकडे घातले आहे. त्यांना यासंदर्भात पत्रसुद्धा देण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेवर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागते. दरम्यान आजूबाजूच्या जलस्त्रोताकडे दुर्लक्ष केले जात असल्याने टंचाई निवारण होताना दिसत नाही. खारघर येथील ओवे कॅम्प धरणाचा जर विकास केला त्याचबरोबर त्यामधील गाळ काढल्यानंतर या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्याचबरोबर डोंगराच्या लगत असलेल्या या धरण परिसराचा पर्यटन म्हणून सुद्धा विकास होऊ शकतो. परंतु याकडे दुर्लक्ष

पत्रकाराने पत्रकारितेला सेवाभाव जोपासावा - मुकेश शिंदे

 खारघर :(प्रतिनिधी) व्यवहारिक आणि व्यवसायिक पत्रकारितेच्या नावाखाली पत्रकारितेत ही चंगळवाद सुरू असून त्यात भांडवलदार आणि प्रस्तापिताची मक्तेदारी होत असून त्यातील राष्ट्रवाद राष्ट्र प्रेम व सेवाभाव जोपासायला हवा असे उदगार सा. भिमसंग्राम चे संपादक व खारघर प्रेस क्लब चे अध्यक्ष मुकेश शिंदे यांनी पत्रकार दिनांच्या शुभेच्छा देताना काढले          देशात एका साचेबद्ध नियोजनबध्द विचारांचे उदातीकरण केले जात असून प्रसार माध्यमाकडुन नि:पक्षपाती रोखठोक व सत्याची कास धरणे अपेक्षित आहे आपली बांधिलकी संविधान देश लोकशाही व जनतेशी असून नवोदीत पत्रकारांना यांचा विसर पडतअसल्याची खंत मुकेश शिंदे यांनी व्यक्त केली       डॉ. बाबासाहेब आंबेडकर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या लोकशाहीवादी सेवाभावी पत्रकारितेचा आदर्श का जोपासला जात नाही असा प्रश्न ही मुकेश शिंदे यांनी पत्रकार दिनी उपस्थित केला

रायगड जिल्हा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी सु.ए.सो.च्या के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी यांची बिनविरोध निवड

  खारघर दि.३ (प्रतिनिधी)-रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्छ माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नवीन पनवेल येथील के.आं.बांठिया महाविद्यालयात संपन्न झाली.या सभेत के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य मा.भगवान शिवदास माळी यांची महासंघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष,प्राचार्य,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी अभिनंदन केले आहे.       रायगड जिल्ह्यात माध्यमिक व उच्छ माध्यमिक महाविद्यालये जवळपास आठशे आहेत.या विद्यालयांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असतात.शासनाशी विचारविनिमय करण्यासाठी कृतिशील असा रायगड जिल्हा मुख्याध्यापक महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.या मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षांची निवड ही जिल्ह्यातील सर्व विद्यालयांतील मुख्याध्यापकांमधून केली जाते.        जिल्हा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी मा.भगवान माळी यांची निवड झाल्याबद्धल कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.बाळाराम पाटील,सुधागड एज्युकेशन सोसा