पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी "आदिवासी दिनदर्शिका" प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद केल्या जात असतात. शिवाय, दरवर्षी प्रमाणे आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने २०२१ या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन रविवार (२७ डिसें) रोजी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत असतांना गणपत वारगडा हे समाजातील वृत्तपत्र "आदिवासी सम्राट"चे संपादक आहेत. त्यांनी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना करून समाजातील अनेक लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. गणपत वारगडा हे २० व्या वर्षापासून समाजाचे काम करत आहेत. आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या शाखा रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, नवी मुंबई जिल्हा तर आता ठाणे जिल्ह्यात सुध्दा त्यांच्या संघटनेच्या शाखा आहेत. त्यामुळे आदिवासी दिनदर्शिका ही समाजातमध्ये सर्वञ पोहोचण्यास सोयीस्कर होत असते. त्यामुळे पञकार गणपत वारगडा यांना समाजात मोलाचे स्थान आहे, असे ही आदिवासी दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्यावेळी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ पत्रकार, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू, क्रियाशील प्रेस क्लब पनवेलचे अध्यक्ष अकबर सय्यद, पनवेल तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, दैनिक रायगड नगरीचे अरविंद पोतदार, आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र सचिव सुनिल वारगडा, आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हाध्यक्ष बुधाजी हिंदोळे, रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी, पञकार राज भंडारी, पञकार रवी गायकवाड, पञकार साहिल रेळेकर, पञकार सनीप कलोते, पञकार विशाल सावंत आदी. उपस्थित होते.होते.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment