पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे* ३१ डिसेंबर २०२० रोजी *द दारूचा नव्हे द दुधाचा* या संकल्पनेतून नागरिकांना करण्यात येणार *मसाला दूध वाटप* करून नशामुक्तीबाबत *जनजागृती*
पनवेल/प्रतिनिधी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई विविध हॉटेल, पब्स, बार किंवा इतर नामांकित ठिकाणी जल्लोष करण्यासाठी तयार असते. ३१ डिसेंबर असला कि सगळीकडे पार्ट्या आयोजित केलेल्या असतात. हॉटेलमध्ये तुडुंब गर्दी असते. या दिवशी तरुणाई मध्यरात्री आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडत असतात तर काहीजण १२ वाजेपर्यंत मद्यपान करण्यात व्यस्त असतात यामुळे नंतर असुरी शक्ती अंगात येऊन भरधाव वेगाने वाहने चालवणे, धिंगाणा मस्ती करणे अशा प्रकारचे प्रकार होऊन तरुण रस्ते अपघातात आपला जीव गमाववतात तर काही जण पुढचे काही महिने तुरुंगात काढतात यासर्वात त्रास फक्त घरच्या लोकांना होती याची जाणीव ठेवूनच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० ते १०.३० या वेळेत नागरिकांसाठी मसाला दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलिसांनी राबविलेल्या नशामुक्ती अभियानात आता पत्रकारांनीही उडी घेतली असून यावेळी नागरिकांना द दारूचा नव्हे तर द दुधाचा हि संकल्पना राबवून व्यसनाधीनतेने होणारे नुकसान याबाबत जनजागृती करण्यात आली. येणार आहे. या कार्यक्रमास शिवराज पाटील (पोलीस उपायुक्त परिमंडळ - २) , विनोद चव्हाण (सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा), रवींद्र गिड्डे (सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडळ -२) , निवृत्ती कोल्हटकर (वपोनि गुन्हे शाखा कक्ष १) , देविदास सोनावणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस ठाणे ), अभिजित मोहिते (वपोनि पनवेल वाहतूक शाखा) यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment