खारघर :स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सेवा योजना हे एक अतूट समीकरण आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रत्येक उपक्रम स्वयंसेवकांच्या खंबीर साथीमुळेच पूर्ण होतो ह्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. गेले काही दिवस समस्त जग कोव्हीड-१९ महामारीशी ताळेबंदीच्या माध्यमातून लढत होते. त्या कठीण काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा भयानक तुटवडा जाणवू लागला आणि स्वंसेवकांनी हे ही आव्हान स्विकारले.रक्त तुटवड्यासारख्या गंभीर प्रश्नाची दखल घेत नवीमुंबईतील सरस्वती काॅलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेने मॅरेथाॅन रक्तदान शिबीरे आयोजित केली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. मंजुषा देशमुख आणि एन्एस्एस् कार्यक्रम अधिकारी डाॅ. सुनिता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.नुकताच पार पडलेल्या महाविद्यालयाच्या एन्एस्एस् युनिटने दि.३० नोव्हेंबर रोजी नाशिकच्या मुखेड-येवला येथे सोशल ग्रुप ऑफ मुखेड आणि नवजीवन रक्तपेढी यांच्या मदतीने ५१ रक्त पिशव्या जमा करण्याचे काम केले. हे अभिमानास्पद कार्य त्याच्या गावी असलेल्या युनिटच्या एका स्वंयसेवकाने ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पार पाडले. आजच्या घडीला एन्एस्एस् युनिटने मुंबई-ठाणे-नाशिक अशा विविध ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबींरामधून केवळ ३६ दिवसांमध्ये तब्बल २७४ रक्त पिशव्या जमा करण्यात यश मिळवले आहे.ह्या अनोख्या विक्रमाचे कौतुक एनएसएस मुंबई विद्यापीठाचे प्रमुख डाॅ. सुधीर पुराणिक तसेच सर्व मान्यवर आणि समाजातील विविध स्तरांतून होत आहे
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment