Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभाग आयोजित *रस्ता सुरक्षा सप्ताह* खारघर येथे पार पडला

   नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभाग आयोजित *रस्ता सुरक्षा सप्ताह* खारघर येथे पार पडला. त्यावेळी रस्त्याच्या सुरक्षेचे महत्त्व पटवून देताना खारघर पोलीस अधिकारी (ट्रॅफिक) आनंद चव्हाण साहेब , संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक/ अध्यक्ष मामा मांजरेकर जी, सचिव अजय माळी , सचिन जोशी , ईश फाऊंडेशनच्या संस्थापक /अध्यक्ष कीर्ती मेहरा जि , प्रोफेसर मोहन सावरकर जी, हरिओम गौतम जी व हरजितसिंग जी , रंजन जी आरती मेहरा जी, रेखा शर्मा जी , मिना जी , आणि पोलिस कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते "२०२१ आदिवासी दिनदर्शिका"चे प्रकाशन

पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी "आदिवासी दिनदर्शिका" प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद केल्या जात असतात. शिवाय, दरवर्षी प्रमाणे आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने २०२१ या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन रविवार (२७ डिसें) रोजी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत असतांना गणपत वारगडा हे समाजातील वृत्तपत्र "आदिवासी सम्राट"चे संपादक आहेत. त्यांनी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना करून समाजातील अनेक लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. गणपत वारगडा हे २० व्या वर्षापासून समाजाचे काम करत आहेत. आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या शाखा रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, नवी मुंबई जिल्हा तर आता ठाणे जिल्ह्यात सुध्दा त्यांच्या संघटनेच्या शाखा आहेत. त्यामुळे आदिवासी दिनदर्शिका ही समाजातमध्ये सर्वञ

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे* ३१ डिसेंबर २०२० रोजी *द दारूचा नव्हे द दुधाचा* या संकल्पनेतून नागरिकांना करण्यात येणार *मसाला दूध वाटप* करून नशामुक्तीबाबत *जनजागृती*

पनवेल/प्रतिनिधी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई विविध हॉटेल, पब्स, बार किंवा इतर नामांकित ठिकाणी जल्लोष करण्यासाठी तयार असते. ३१ डिसेंबर असला कि सगळीकडे पार्ट्या आयोजित केलेल्या असतात. हॉटेलमध्ये तुडुंब गर्दी असते. या दिवशी तरुणाई मध्यरात्री आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडत असतात तर काहीजण १२ वाजेपर्यंत मद्यपान करण्यात व्यस्त असतात यामुळे नंतर असुरी शक्ती अंगात येऊन भरधाव वेगाने वाहने चालवणे, धिंगाणा मस्ती करणे अशा प्रकारचे प्रकार होऊन तरुण रस्ते अपघातात आपला जीव गमाववतात तर काही जण पुढचे काही महिने तुरुंगात काढतात यासर्वात त्रास फक्त घरच्या लोकांना होती याची जाणीव ठेवूनच पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० ते १०.३० या वेळेत नागरिकांसाठी मसाला दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.          नवी मुंबई पोलिसांनी राबविलेल्या नशामुक्ती अभियानात आता पत्रकारांनीही उडी घेतली असून यावेळी नागरिकांना द दारूचा नव्हे तर द दुधाचा हि संकल्पना राबवून व्यसनाधीनतेने होणारे नुकसान याबाबत जनजागृती करण्यात

सरस्वती इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटकडून मॅरेथाॅन रक्तशिबीरांचा धडाका

खारघर : स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सेवा योजना हे एक अतूट समीकरण आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रत्येक उपक्रम स्वयंसेवकांच्या खंबीर साथीमुळेच पूर्ण होतो ह्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. गेले काही दिवस समस्त जग कोव्हीड-१९ महामारीशी ताळेबंदीच्या माध्यमातून लढत होते. त्या कठीण काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा भयानक तुटवडा जाणवू लागला आणि स्वंसेवकांनी हे ही आव्हान स्विकारले. रक्त तुटवड्यासारख्या गंभीर प्रश्नाची दखल घेत नवीमुंबईतील सरस्वती काॅलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेने मॅरेथाॅन रक्तदान शिबीरे आयोजित केली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. मंजुषा देशमुख आणि एन्एस्एस् कार्यक्रम अधिकारी डाॅ. सुनिता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. नुकताच पार पडलेल्या महाविद्यालयाच्या एन्एस्एस् युनिटने दि.३० नोव्हेंबर रोजी नाशिकच्या मुखेड-येवला येथे सोशल ग्रुप ऑफ मुखेड आणि नवजीवन रक्तपेढी यांच्या मदतीने ५१ रक्त पिशव्या जमा करण्याचे काम केले. हे अभिमानास्पद कार्य त्याच्या गावी असलेल्या युनिटच्या एका स्वंयसेवकाने ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पार पाडले. आजच्या घडीला एन्एस्एस् युन