पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना नविन पनवेल रेल्वेस्थानक परिसरात सिडकोने तात्पुरत्या स्वरुपात रोज बाजारासाठी, "मंगलमुर्ती रोज बाजार" या संस्थेला जागा उपलब्ध करून दिली आहे. या रोजबाजारामध्ये टपऱ्या बसविलेल्या असून या टपऱ्या पुढे मोठे बाकडे बसविले असून या टपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री केली जाते त्यामुळे पदपथावर चालणाऱ्या नागरिकांना जिव मुठीत घेऊन येथून चालावे लागते या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे महापालिकेचा कोणताही परवाना नसतात फूटपाथवर इडली सांबर,मिसळपाव, चायनिज,वडापावची विक्री केली जाते या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही फूटपाथवर सांयकाळी वडापाव,चायनिज खाण्यासाठी नागरिक गर्दी करत असून पदपथावर कचरा टाकला जातो .तसेच समोरील सिडको उद्यानातून पाणी आणून पदपथावरच पदार्थ बनविले जातात .अस्वच्छ व गर्दीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे व या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती जास्त आहे.अनेकांनी हे स्टाॕल 15 ते 20 हजार रुपायांनी भाडेतत्त्वावर दिले आहेत. या टपऱ्या राजकीय वरदहस्त असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. महापालिका अतिक्रमण विभागाची गाडी आली की हे पदपथावरील स्टाॕल मार्केटच्या आत पळवितात व अतिक्रमण पथक गेले की पुन्हा पदपथावर स्टाॕल लावतात. महापालिकेने अशा बेकायदेशीर खाद्य पदार्थांच्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथिल नागरिक करत आहेत.
Comments
Post a Comment