Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

श्री महाकाली देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरती संग्रह 2020 पुस्तिकेचे प्रकाशन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः खारघर येथील श्री महाकाली देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही आरती संग्रह 2020 पुस्तिकेचे प्रकाशन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह आयोजक उपमहानगर संघटक गुरुनाथ पाटील, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाकक्षप्रमुख शशिकांत डोंगरे, युवा सेनेचे नरेश ढाले आदी उपस्थित होते. या पुस्तिकेचा फायदा नवरात्रौत्सवात अंबेमातेच्या भक्तांना होईल, असे प्रतिपादन प्रकाशनच्या वेळी जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी केले.    

देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  

पनवेल (हरेश साठे) कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूत प्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी कमी असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे केले.               कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करत देवदूताप्रमाणे प्रामाणिक कार्य करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनमध्ये समारंभपूर्वक 'कोरोना देवदूत' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.           दै. शिवनेरच्या वतीने बुधवारी सायंकाळी झालेल्या या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हा

नविन पनवेलमध्ये स्टेशन परिसरात रोज बाजारातील विक्रेत्यांचे पदपथावरती अतिक्रमण-प्रशासनाचे दुर्लक्ष

      पनवेल :  पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना नविन पनवेल रेल्वेस्थानक परिसरात सिडकोने तात्पुरत्या स्वरुपात रोज बाजारासाठी, "मंगलमुर्ती रोज बाजार" या संस्थेला जागा उपलब्ध करून दिली आहे. या रोजबाजारामध्ये टपऱ्या बसविलेल्या असून या टपऱ्या पुढे मोठे बाकडे बसविले असून या टपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री केली जाते त्यामुळे पदपथावर चालणाऱ्या नागरिकांना जिव मुठीत घेऊन येथून चालावे लागते या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे महापालिकेचा कोणताही परवाना नसतात फूटपाथवर इडली सांबर,मिसळपाव, चायनिज,वडापावची विक्री केली जाते या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही फूटपाथवर सांयकाळी वडापाव,चायनिज खाण्यासाठी नागरिक गर्दी करत असून पदपथावर कचरा टाकला जातो .तसेच समोरील सिडको उद्यानातून पाणी आणून पदपथावरच पदार्थ बनविले जातात .अस्वच्छ व गर्दीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे व या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती जास्त आहे.अनेकांनी हे स्टाॕल 15 ते 20 हजार रुपायांनी भाडेतत्त्वावर दिले आहेत. या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

पनवेल(प्रतिनिधी) : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि.१४) सायंकाळी ०५ वाजता मुंबईतील राजभवन येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.             या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, या वेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दै शिवनेर गणेश दर्शन स्पर्धेत सहभागी होऊन गणेशोत्सवात रक्तदान शिबिर आयोजित करणार्‍या व अधिकाधिक रक्त संकलित करणार्‍या पहिल्या तीन गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे, अशी माहिती ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे यांनी दिली.