खारघर : दरवर्षी भारतामध्ये ५ सप्टेंबर हा सर्वत्र शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. परंतु कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतात ताळेबंदी लागू असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तरीदेखील नेहमीप्रमाणे खारघर मधील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने याहीवर्षी वेगळे पण जपत 'शिक्षकदिन समारंभ' साजरा केला.
संघर्षाच्या वाटेवर चालताना शिक्षक सोबती बनतात आणि अंधारात वाट दाखण्यासाठी तारा बनतात. हेच शिक्षक कोरोना महामारीच्या काळात सुद्धा वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता ज्ञानदानाचे श्रेष्ठदान करीत आहे. यासर्व बाबी लक्षात घेऊन रा.से.यो. स्वयंसेवकांनी एक चित्रफित महाविद्यालयातील शिक्षकांना समर्पित केली होती. त्या चित्रफितीत सर्व शिक्षकांच्या आठवणींना संग्रह केला होता.
त्यासहित प्रत्येक स्वयंसेवकाने आपल्या आवडत्या शिक्षकांना एक पत्र लिहून भावनांना मोकळी वाट करून दिली.त्या पत्रांचेही विविध स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.'ऑनलाईन' कार्यक्रमामध्ये या सर्व चित्रफिती आणि पत्रांचे सादरीकरण करण्यात आले. काही स्वयंसेवकांनी कविता सादर केल्या तर काहींनी आपल्या सुरांची मैफिल भरवली होती.यावेळी सर्व शाखांचे प्रमुख उपस्थित होते.त्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला.
सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंजुषा देशमुख आणि रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ.सुनीता पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.
Comments
Post a Comment