खारघर : जगभरात सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तरी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय ह्यापूर्वीच घेण्यात आला आहे. ह्या संधीचा फायदा घेत खारघरच्या सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेने 'सिव्हील इंजिनीअरिंग स्टुडन्ट्स असोसिएशन' (स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना) यांच्या विद्यमाने दि.5 सप्टेंबर रोजी 'ऑनलाईन शिक्षक दिन' साजरा केला.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.मंजुषा देशमुख, सिव्हील इंजिनिअरिंगच्या शाखाप्रमुख प्रा.रोशनी जाॅन व प्रा.पूजा सोमाणी व विद्यार्थी संघटनेच्या शिक्षक प्रमुख प्रा.युगंधरा कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शिक्षक हे विद्यार्थ्यांना पावलोपावली मार्गदर्शन करत असतात. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संघटनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांच्या सूरांची मैफिल भरली होती. त्यांच्या मधूर गायनामुळे वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्क्रीनवर दिसणा-या ईमोजींचा वापर करून चित्रपटांची तसेच अभ्यासक्रमासंबंधित नावे ओळखण्याचा खेळ रंगला होता. अनेक शिक्षकांनी त्यांच्या कलांगुणांना मोकळी वाट करुन दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील ख-या कलाकाराची ओळख पटली. कार्यक्रमाच्या शेवटी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिक्षकांना त्यांच्या गुरूविषयी विचारले असता त्यांच्या आयुष्यातील शिक्षकांचा वाटा किती मोलाचा आहे हे प्रकर्षाने दाखवून दिले. तसेच शिक्षकांकडून कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment